श्री बंकटस्वामी महाविद्यालयात श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज :– एक विचार, जो युगानुयुगे प्रेरणा देतो!”
बीड : दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव प्रेरणादायी वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.युवराज महाडिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.शिवाजी मोरे व कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.ब्रम्हनाथ मेंगडे व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.बाबासाहेब जावळे यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनी कु.मयुरी नाईकवाडे हिने शिवाजी महाराजांवरील पाळणा सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
प्रा.डॉ.नीता बावणे आणि प्रा.नितीन चव्हाण यांनी शिवचरित्रावर आधारित कविता सादर केली. तसेच डॉ.राजीव काळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात कु.प्रतीक्षा शेळके आणि कु.अश्विनी गायकवाड यांनी जोशपूर्ण भाषण सादर करून महाराजांचे महान कार्य आणि विचार उलगडले. प्रा.अमोल घोलप यांनी आपल्या शैलीत छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर करून कार्यक्रमात जोश निर्माण केला.प्रमुख मार्गदर्शक प्रा. युवराज महाडिक यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण, स्वामीनिष्ठता, स्त्री सन्मान, तसेच तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थिती यावर मोलाचे विचार मांडले.कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवाजी महाराज हे संपूर्ण मानव जातीला प्रेरणा देणारे राजा असल्याचे सांगितले.
“साडेतीनशे वर्षांपूर्वी जन्मलेला राजा आजही आपल्याला प्रेरणा देतो, म्हणूनच आपण त्यांचा जन्मोत्सव साजरा करतो” असे मत त्यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.महादेव जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.अनिकेत भोसले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.