बीड

फडणवीसांची मोठी खेळी, ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही तिथे संपर्कमंत्री, कुठे कुणाची नियुक्ती?


सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी भारतीय जनता पक्षाकडून विशेष नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री काम करणार आहेत. पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तीव्र संघर्ष सुरू असताना संपर्कप्रमुख हे नवे पद भाजपने निर्माण केलेले आहे.

 

संपर्कमंत्री नेमून अप्रत्यक्षपणे मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर धाक राहावा, यासाठी भाजपने मोठी चाल खेळल्याची चर्चा आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हा शह देण्याचाही भाजपचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

 

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आपल्यालेच मिळावे, असा राजकीय नेत्यांचे प्रयत्न असतो. सरकार स्थापन झाल्यानंत, असे मंत्रिपदासाठी आणि चांगल्या खात्यासाठी जसे प्रयत्न झाले तसे स्व जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठीही नेत्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. परंतु तरीही तिन्ही पक्षातले काही नेते नाराज झाले आहेत. भाजपमधील नाराजी शमविण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या कामासाठी भाजपने संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण केल्याचे सांगितले जाते.

 

संपर्कमंत्र्यांवर कोणत्या कामाची जबाबदारी असेल?

पालकमंत्रिपदाच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संपर्कमंत्री हे नवे पद निर्माण करून कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यावर पक्षाचा भर असेल. पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेचे कोणतेही काम अडू नये तसेच सरकारमध्ये पक्ष कार्यकर्त्यांचाही सहभाग असावा, यासाठी संपर्कमंत्री प्रयत्न करतील, असे सांगण्यात येते.

 

ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही, तिथे जाऊन संपर्कमंत्री कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतील. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू असताना युतीच्या राजकारणात कार्यकर्त्यांचा बळी जाऊ नये वा त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

 

कोण कुठे संपर्कमंत्री?

ठाणे- गणेश नाईक, पालकमंत्री एकनाथ शिंदे
बीड- पंकजा मुंडे, पालकमंत्री-अजित पवार
संभाजीनगर- अतुल सावे, पालकमंत्री- संजय शिरसाट
पुणे- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री- अजित पवार
कोल्हापूर- माधुरी मिसाळ, पालकमंत्री- प्रकाश आबिटकर
रत्नागिरी-उदय सामंत, पालकमंत्री- आशिष शेलार

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button