वारंवार खिडकीत बादली लटकवायची महिला, पोलिसांनाही अजब वाटलं, घरात गेले, दृश्य पाहूनच चक्रावले
असं म्हणतात की एखाद्याच्या चेहऱ्यावर तो गुन्हेगार आहे हे लिहिलेलं नसतं. जेव्हा असे गुन्हेगार समोर येतात जे गुन्हा करण्यास सक्षम आहेत अशी कल्पनाही करता येत नाही तेव्हा हे अनेकदा खरे सिद्ध होतं.
आपल्या देशातच नाही तर परदेशातही गुन्ह्यांच्या विचित्र कथा समोर येतात. यावेळी, स्पेनमधील अशाच एका महिलेची कहाणी बातम्यांमध्ये आहे, जी पोलिसांनाही आश्चर्यचकित करते.
पोलिसांना अशी अपेक्षाही नव्हती की एवढी साधी दिसणारी महिला कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरणारे कृत्य करू शकते. जेव्हा ते त्याच्या घरी पोहोचले तेव्हा आतले दृश्य पाहून अधिकारी थक्क झाले. ही घटना स्पेनमधील आहे, जिथं सँटेंडरमध्ये राहणाऱ्या एका 87 वर्षीय वृद्ध महिलेला अशा आरोपांवर अटक करण्यात आली आहे ज्याची क्वचितच कोणी अपेक्षा केली असेल.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, पोलिसांनी स्पेनमधील सँटेंडर येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला अटक केली आहे. ती ध्या सॅन्टोना तुरुंगात आहे. 87 वर्षीय ही महिला तिच्या घराच्या खिडकीबाहेर बसून दोरीच्या साहाय्याने बादली खाली लटकवत असे. लोक खालून त्यात काहीतरी ठेवायचे आणि ती बाई ते वर खेचायची. लोकांना वाटलं की ती वृद्ध महिला अशा प्रकारे तिला आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करत असेल पण इथं तर प्रकरणच वेगळं होतं.
जेव्हा पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना धक्काच बसला.
खरंतर, ती महिला जी बादली लटकवायची, तिथे लोक खाली पैसे ठेवायचे आणि वरती पैसे मोजून ती त्यांना त्या रकमेची ड्रग्स पुरवायची. ती निष्पाप दिसत असल्याने आणि आधाराशिवाय चालू शकत नसल्याने, कोणीही ती असं काही करत असेल अशी अपेक्षाच कोणी केली नव्हती. पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्यांना 1.8 किलो स्पीड, 1.5 किलो कोकेन आणि 1.2 किलो गांजा सापडला. एवढंच नाही तर तिच्याकडे ब्लेड, एक रिव्हॉल्व्हर आणि तीन बनावट पिस्तूलही होते.