‘या’ झाडाची साल आणि पानं अत्यंत चमत्कारी, रक्तातली साखर करतात कंट्रोल!
सध्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य प्रचंड धावपळीचं झालं आहे. त्यात वाढत्या प्रदूषणामुळे साठीतील आजार अगदी विशीतच जडतात. मधुमेहाचा त्रास तर आता सामान्य झालाय.
असंतुलित जीवनशैलीमुळे तरुणपणातच मधुमेहाला सामोरं जावं लागतं. एकदा रक्तातली साखर वाढली की आवडीचे पदार्थ खाणंही कठीण होतं.
डॉ. रास बिहारी तिवारी सांगतात की, हाय ब्लड शुगरमुळे भविष्यात विविध समस्यांचा धोका निर्माण होतो. किडनी फेल्युअर, हार्ट डिसीज, नर्व्ह डॅमेज होऊ शकतं. परंतु काळजी नसावी, आपण घरच्या घरी काही उपाय करूनही रक्तातली साखर नियंत्रित ठेऊ शकतो.
डॉ. रास बिहारी तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कडूलिंबाच्या पानांमध्ये अँटी-डायबिटिक, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित राहू शकतं. कडूलिंबाची पानं, साल आणि रस डायबिटीज रुग्णांमध्ये अतिशय फायदेशीर ठरतो. दररोज सकाळी उपाशीपोटी 5 ते 10 मिलीलिटर ताज्या कडूलिंबाचा रस प्यायल्यानं रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. तसंच कडूलिंबाची सुकलेली पानं वाटून बनवलेली पावडरदेखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ही पावडर दररोज सकाळी कोमट पाण्यानं घेण्याचा सल्ला दिला जातो.
कडूलिंबाची साल उकळून बनवलेला काढा डायबिटीजवर गुणकारी असतो. या काढ्यामुळे शरीरातील ग्लुकोज मेटाबॉलिज्म सुधारतं आणि इन्सुलिन रजिस्टन्स कमी होतं. कडूलिंबाच्या तेलाचे काही थेंब पाण्यात मिसळून पिणंही फायदेशीर असतं. परंतु डायबिटीजची काही औषधं सुरू असतील, तर कडूलिंबाचा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण कडूलिंबामुळे साखर वेगानं कमी होते, त्यामुळे औषधांचा प्रभाव वाढू शकतो आणि शरीरातील साखरेचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त कमी होऊ शकतं. तसंच गरोदर महिलांनी आणि ब्लड प्रेशरच्या रुग्णांनीही कडूलिंबाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.