चुलत भावाचा अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,पीडित मुलगी गर्भवती
दौंड तालुक्यात बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चुलत भावाने अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.
लैंगिक संबंधातून ही पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडित तरुणी दौंड तालुक्यातील रहिवासी असून तिच्यावर वायरलेस फाटा आणि पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा येथे आरोपींनी अनेक वेळा अत्याचार केले आहेत.
यातील आरोपी पैकी एकाचा दौंड तालुक्यात एक फोटो स्टुडिओ आहे. या स्टुडिओत आणि पीडितेच्या घरी आरोपींनी वेळोवेळी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. 2024 मध्ये मार्च ते जून दरम्यान हा अत्याचार झाले आहेत.
सख्खा चुलत भाऊ आणि अन्य एकाविरोधात पीडितेच्या तक्रारीवरून दौंड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दौंड पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.