बोधेगावमध्ये पुजाऱ्याचा निर्घृणपणे हत्याच्या घटनेच्या निषेधार्थ दिवसभर कडकडीत बंद
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील पुजारी नामदेव रामा दहातोंडे यांचा अत्यंत निर्घृणपणे हत्याच्या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी कडकडीत बंद पुकारण्यात आला व ग्रामस्थांच्या वतीने घटनेचा निषेध करून सखोल चौकशी करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली ग्रामस्थांनी बोधेगाव पोलिसांच्या कारभारावर जोरदार टीका केली आणि निष्क्रिय पोलिसांच्या तातडीने बदली करण्याची मागणी केली.
बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील पुजारी नामदेव रामा दहातोंडे हे दि २६ जानेवारी पासून गायब झाले होते गुरवारी मंदिर जवळच्या तांबे यांच्या विहिरीत दहातोंडे यांचे शिर मुंडके आढळून आले, तर शुक्रवारी अविनाश कदम यांच्या विहिरीत दहातोंडे यांचे उर्वरित शरीर आढळून आले. या घटनेमुळे बोधेगाव भागात एकच खळबळ उडाली आहे.
पुजारी दहातोंडेयांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शनिवारी बोधेगाव बंद चे अहावन केले होते दिवसभर शहर कडकडीत बंद होते सर्व व्यवहार बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून सायंकाळ पर्यंत बंद पाळण्यात आला.
ग्रामस्थांनी सकाळी आंबेडकर चौक ते बोधेगाव पोलीस दुरर्क्षेत्रावर निषेध रॅली काढण्यात आली त्यावेळी असंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले
यावेळी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष शाहुराव खंडागळे, सुनिल खंडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसले, अरुण झांबरे, नामदेव कसाळ, गणेश बोरुडे, यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या व बोधेगाव पोलीस दुरक्षेत्रातील काही कमचुकार कर्मचाऱ्याचा शाहू खंडागळे यांनी समाचार घेतला त्यांचा तातडीने बदल्या करण्याची मागणी केली तर या हत्याकांडाचा लवकर तपास लावण्यात येवून स्थानिक गुन्हे शाखेने याचा सखोल तपास करण्याची जोरदार मागणी केली. तसेच सदर पुजारी हे मागासवर्गीय असल्याने काही पोलिस कर्मचाऱ्यांनी या घटने बाबत दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थ असंतोष निर्माण झाला असून शेवगाव पोलिस निरीक्षक च्या मर्जीतील पोलिसाची तातडीने बदली करण्याची मागणी सभेत शाहू खंडागळे यांनी केली आहे.
निषेध सभेत वंचित महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा संगीता ढवळे, बाळासाहेब भोंगळे,गणेश बोरूडे, ज्ञानेश्वर गिरी, विष्णु विर, नितीन पगारे राम भोंगळे, अध्यक्ष श्रीधर भोंगळे,बन्सी मिसाळ, बबन कुरेशी, सुरेश जाधव, सचिन शेळके, पिंटु गुरव,सादिक पठाण, लक्ष्मण काळे, काकासाहेब घोरतळे, बबन मिसाळ, शफीक भाई शेख, राजु इंगावले, सचिन अंगरख, संदेश खंडागळे, अंबादास मिसाळ संगाभाई फिटर, वाल्मीक चव्हाण, दिलीप भोंगळे, भागवत भोसले, बापुलाल पठाण, मोहन काशिद, दत्ता खरात, बाळासाहेब बनसोडे,हरिभाऊ झांबरे, विश्वनाथ कुढेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दहातोंडे यांच्यावर नागलवाडी येथे अंत्यसंस्कार
पहिलवान बाबा मंदिरातील मयत पुजारी दहातोंडे यांच्यावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणात मुळ गावी नागलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेत्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता
घटनास्थळी पोलिस अधिकाऱ्यांचा भेटी
जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक सुनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसे तज्ञ आदी पथक घटनस्थळी भेट देवून या हत्याकांडाचा तपास सुरू केला आहे.
या हत्या प्रकरणी संशयित म्हणून एका जणाला ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांना काही धागदोरे मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे ही क्रूर हत्या का केली या मागचे नेमक कारण काय आणि हि हत्या कोणी केली याबाबत ग्रामस्थ उलट सुलट चर्चा सुरू आहे.