लाखो बळी जाणार! कुणी ज्योतिषी नाही वैज्ञानिकांनी केली भयंकर भविष्यवाणी, असं काय घडणार?
बाबा वेंगा, नास्त्रेदामस, निकोलस असे किती तरी भविष्यवक्ते आहेत ज्यांनी काही भविष्यवाणी केल्या. त्यापैकी काही भविष्यवाणी खऱ्या ठरल्या असा दावाही केला जातो. पण आता कुणा भविष्यवक्ता किंवा ज्योतिषी नाही तर चक्क वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी भविष्यवाणी केली आहे.
तीसुद्धा भयानक आहे. या भाकिताने संपूर्ण जग चिंतेत आहे.
लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनने नुकतंच एक संशोधन प्रसिद्ध केलं आहे. ज्यात मृत्यूची भविष्यवाणी करण्यात आली आहे. थोडथोडके नव्हे तर तब्बल 58 लाख मृत्यू. 2015 ते 2099 दरम्यान युरोपमध्ये 58 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
58 लाख लोकांच्या मृत्यूचं कारण काय?
या संशोधनात केवळ अशाच मृत्यूंचा समावेश करण्यात आला आहे जे हवामान बदलामुळे होणार आहेत. थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा उष्णतेमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त असेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
या अभ्यासात युरोपमधील एकूण 854 शहरांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये भविष्यात उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावला गेला होता. योग्य ती काळजी न घेतल्यास 5,825,746 लोकांना आपला जीव गमवावा लागेल.
बार्सिलोना हे उष्णतेमुळे सर्वाधिक मृत्यूचं ठिकाण असेल, त्यानंतर रोम, नेपल्स आणि माद्रिदचा क्रमांक लागतो.
संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ पियरे मॅसेलॉट यांनी सांगितलं की, त्यांच्या अहवालाचे परिणाम हवामान बदल आणि वाढत्या उष्णतेबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या गरजेवर भर देतात. आपण वेळीच उपाययोजना करायला सुरुवात केली, तर हवामानातील बदल टाळून लाखो जीव वाचवता येतील.
संपूर्ण जगासाठी इशारा
शतकाच्या अखेरीस उष्णतेने लोक मरतील. विशेषत: भूमध्यसागरीय भागात याचे परिणाम भयंकर होतील. हा अहवाल केवळ युरोपसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी इशारा आहे.
2025 हे वर्ष विनाशकारी!
शास्त्रज्ञांनी जे सांगितलं ते 2099 सालापर्यंत घडेल. पण 2025 या वर्षात काय घडणार याबाबत बाबा वेंगा आणि नास्त्रेदामस या दोघांनीही सारखी भविष्यवाणी केली आहे, जी भयानक आहे. यामुळे जगभर खळबळ उडाली आहे.
नॉस्त्रेदामसची 2025 सालाबाबत भविष्यवाणी
2025 या वर्षासाठी नॉस्त्रेदामसने अनेक धोकादायक भाकितं केली आहेत. त्यातील एक अंदाज अणु तळांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांबाबत आहे. नॉस्त्रेदामसने त्याच्या शतकी पुस्तकात तिसऱ्या महायुद्धाच्या ट्रिगर पॉईंटची चर्चा केली आहे. ज्यामध्ये युरोपच्या आण्विक तळांवर दहशतवादी हल्ला होणार असल्याचं म्हटलं आहे.
नॉस्त्रेदामसच्या भविष्यवाण्यांचं डिकोडिंग करणाऱ्या केन बिस्टने आपल्या पुस्तकात या दहशतवाद्यांना रशिया शस्त्रे आणि प्रशिक्षण देणार असल्याचं लिहिलं आहे. या दहशतवाद्यांना सीरियातील खोऱ्यात आण्विक लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी 10 वर्षे प्रशिक्षण दिलं जाईल. हे दहशतवादी नाटोचे आण्विक तळ उद्ध्वस्त करून युरोपच्या सामर्थ्याचं मोठं नुकसान करतील. यानंतर रशिया आणि चीनचे सैन्य मिळून भूमध्य समुद्रातून युरोपवर हल्ला करतील.
ज्युदो आणि कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट असलेला रशियाचा शासक चीनला सोबत घेऊन तिसरं महायुद्ध सुरू करेल. चीन आणि रशियाच्या संयुक्त सैन्याला जग घाबरेल. परंतु युरोपचे देश मोठ्या प्रमाणात कमकुवत होतील कारण दहशतवादी आधीच त्यांच्या अण्वस्त्र साठ्याचा स्फोट करतील. आणि यानंतर अमेरिकेच्या युद्धनौकेवर आण्विक हल्ल्यानंतर तिसरे महायुद्ध सुरू होईल.
2025 सालाबाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी
बाबा वेंगा यांनी 2025 साठी भाकीत केलं आहे की सीरियातील सत्तापालटानंतर मोठं युद्ध सुरू होऊ शकतं. बशर अल-असद गेल्यानंतर सीरियात महासत्तांमध्ये संघर्ष होण्याची शक्यताही दिसून येत आहे. जेव्हा सीरिया संपेल तेव्हा जग पेटेल. जेव्हा सीरिया संपेल तेव्हा पश्चिम आणि पूर्व यांच्यात असं युद्ध होईल ज्यामुळे तिसरं महायुद्ध होईल. एक युद्ध… जे पश्चिमेला पूर्णपणे नष्ट करेल. या शब्दांमागे जगातील सर्वात मोठी भीती आहे. सर्वात मोठी आग, ज्यात संपूर्ण पृथ्वी जळून जाण्याचा धोका आहे. सीरियामध्ये जे काही 10 दिवसात घडलं ते काही नाही.
बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षासाठी आणखी धोकादायक भविष्यवाणी केली आहे… विशेषतः ही भविष्यवाणी युरोपमधील लाखो लोकांसाठी खूप भीतीदायक आहे. बाबा वेंगा यांनी हयात असतानाच सांगितले होते की, 2025 मध्ये युरोपमध्ये अनेक मोठे दहशतवादी हल्ले होतील, हे हल्ले इतके मोठे असतील की ते महायुद्धासारखे विध्वंस घडवून आणतील. 2025 साठी बाबा वेंगाचे भाकीत अनेक देशांतील सत्तापालटांसह युरोपमध्ये भयंकर युद्धाची भविष्यवाणी करते. असेही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे
युरोप खंड युद्धातून वाचला तर त्याला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसेल. ज्याचा खूप खोलवर परिणाम होऊ शकतो बाबा वेंगा यांच्या मते, 2025 मध्ये लोकसंख्येमध्ये मोठी घट होईल. 2025 मध्ये, मानव इतर ग्रहांवरील प्राणी देखील शोधू शकतात.
बाबा वेंगाने केलेले आणखी एक भाकीत लोकांना त्रासदायक आहे. ते म्हणजे सर्वात मोठं जैविक शस्त्र जगाला घाबरवेल. हे केवळ मानवांमध्येच नव्हे तर झाडं, वनस्पती आणि समुद्रातही कहर निर्माण करेल. बाबा वेंगा यांनी सांगितले की जगातील सर्वात मोठी जैविक शस्त्रांची चाचणी 2025 मध्ये होणार आहे. एवढंच नाही तर 2025 हे सायबर युद्धाचं वर्षही ठरू शकतं. ज्यामध्ये जगभरात सायबर हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ होईल. सायबर हॅकर्स… पॉवर ग्रीड्स आणि एनर्जी प्लांट्ससारख्या महत्त्वाच्या संस्था सायबर हल्ल्यांना बळी पडतील. 2025 मध्ये जागतिक तापमानवाढीमुळे जगातील काही भाग उद्ध्वस्त होतील, असेही वेंगा यांनी म्हटलं आहे.