क्राईम

अचानक आपल्या आधीच्या सासूला पाहताच,बनावट वधूने तेथून धूम ठोकली


श्रीगोंदा: सध्या लगीन सराई हंगाम जोमात सुरू असून श्रीगोंदा तालुक्यात एका लग्नात आगळा वेगळा प्रकार पाहायला मिळाला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील मुलगा पुणे येथील खासगी कंपनीत कामास आहे.

मुलाचे लग्न करायचे असल्याने घरची मंडळी मुलगी पाहत होते. त्याच दरम्यान लग्न जमविणार्‍या मध्यस्थीची भेट झाली. त्या मध्यस्थीने विवाह जमवून देतो; पण लग्नासाठी दोन लाख 60 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. विवाह निश्चित झाल्यानंतर 40 हजार व लग्न झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले. वधू-वराचे लग्न आळंदी येथे पार पडले. रितीरिवाजाप्रमाणे सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास आजूबाजूच्या नातेवाइकांना निमंत्रण देण्यात आले होते.

 

या कार्यक्रमास एक महिला नातेवाईकही आली होती. पूजेच्या दरम्यान त्या महिलेने वधूला पाहताच तिला धक्काच बसला. तिने ही माहिती नातेवाइकांना सांगितली. ज्या वधूशी लग्न झाले आहे त्याच वधूचे मागील वर्षी माझ्या मुलाशी लग्न झाले होते. आमच्याकडून दोन लाख रुपये घेऊन या वधूने पलायन केले होते. हे संभाषण त्या बनावट वधूने ऐकले. लागलीच मध्यस्थी अन् त्या बनावट वधूने तेथून धूम ठोकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वराकडील मंडळीने लग्न जमविणार्‍या मध्यस्थीकडे दिलेले पैसे परत मिळावे यासाठी मागणी केली. मात्र, त्या मध्यस्थीने पैसे देण्यास नकार दिला. लग्नही गेले अन् पैसेही अशी अवस्था त्या वरासह नातेवाइकांची झाली आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

समाजात बदनामी नको म्हणून पोलिसात तक्रार नाही

सध्या अनेक मुलांचे काही कारणास्तव लग्न रखडलेले पाहायला मिळत असून अश्याच मुलांच्या नातेवाईकांना ह्या टोळ्यातील सदस्य हेरतात व तुमच्या मुलाला वधू पाहून देतो म्हणून आर्थिक देवाण घेवाण करून तात्पुरत्या स्वरूपात लग्न ही लाऊन देतात व लग्नानंतर दाग दागिने घेऊन वधू पसार होते. यानंतर परत मुलाच्या नातेवाईकांनाच पोलिस केस करून बदनामी करण्याची धमकी दिली जाते. समाजात बदनामी नको म्हणून कित्येक कुटुंबे आज या प्रकाराला बळी पडूनही गप्प आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button