देश-विदेश

शेअर मार्केटमध्ये भूकंप, एका कंपनीचे 465 अब्ज डॉलर्स बुडाले


चायना प्रोडक्ट असो किंवा चीनचे अॅप चीनचे फोन, जगभरात कमी किमतीमध्ये जास्त फीचर्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. पुन्हा एकदा चीनने अमेरिकेची कंबर मोडण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

याचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम झाला आणि धडाधड शेअर मार्केट कोसळलं, त्यामुळे गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका सहन करावा लागला.

चिनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप DeepSeek कंपनीमुळे गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेमुळे Nvidia कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यामुळे जगातील सर्वात मोठ्या चिपनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर व्हॅल्यूमध्ये मोठी घट झाली. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी नुकसान झालं. सोमवारी बाजार उघडताच Nvidia च्या शेअर्समध्ये 13% इतकी मोठी घसरण झाली, ज्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य जवळपास 465 अब्ज डॉलर्सने कमी झाले.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 9% घसरण झाली होती, ज्यामुळे 279 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. Nvidia चा बाजारातील महत्त्वाचा वाटा असल्यामुळे या घसरणीचा परिणाम दिसून आला. S&P 500 आणि Nasdaq 100 सारख्या प्रमुख निर्देशांकांवरही परिणाम झाला.

या कारणामुळे घसरले शेअर्स
Nvidia च्या घसरणीमागचे कारण चिनी कंपनी DeepSeek ने विकसित केलेल्या कमी खर्चिक AI मॉडेलमुळे Nvidia आणि इतर सेमीकंडक्टर निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठी विक्री झाली आहे. DeepSeek च्या लो-कॉस्ट अ‍ॅप्रोचने गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण केली आहे की, अमेरिकन कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स विकसित करण्यासाठी खूप जास्त गुंतवणूक केली आहे.

DeepSeek चे नवीनतम AI मॉडेल, जे गेल्या आठवड्यात सादर केले गेले, ते OpenAI आणि Meta Platforms Inc. यांसारख्या प्रख्यात कंपन्यांशी स्पर्धा करत आहे. क्वांट-फंड प्रमुख लियांग वेनफेंग यांनी स्थापन केलेले हे ओपन-सोर्स उत्पादन आता ऍपल इंकच्या ऍप स्टोअरमध्ये टॉप रँकिंगवर आहे.

Nvidia च्या भविष्यासाठी आव्हाने
Nvidia ही AI तंत्रज्ञानासाठी वापरल्या जाणाऱ्या सेमीकंडक्टर डिझाइन्सचा प्रमुख पुरवठादार आहे. यामुळे AI क्षेत्रातील खर्चात वाढ झाल्याने Nvidia ला मोठा फायदा झाला आहे. मात्र, DeepSeek सारख्या चिनी कंपन्यांच्या तुलनेत Nvidia चे उत्पादन अधिक खर्चिक असल्याने गुंतवणूकदारांच्या अपेक्षांमध्ये मोठा फरक पडत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button