लोकशाही विश्लेषण

आधी शारीरिक संबंध, नंतर करतात लग्न, भारतात आहे आगळी परंपरा असलेले गाव


आजकाल महानगरात अनेक तरुण आणि तरुणी लग्नाआधीच एकत्र राहत असतात. त्याला लिव्ह इन रिलेशनशिप असे म्हटले जात आहे. परंतू एका गावात देखील अशी परंपरा आहे हे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.या गावातील लोक अनेक वर्षांपासून चालत आलेली ही अनोखी परंपरा पाळत आहेत.

येथे तरुण आणि तरुणी लग्ना आधीच एकत्र राहतात आणि शारीरिक संबंध प्रस्तापित करीत असतात. त्यात जर ते खुश असले तरच मग लग्नाचा विचार केला जातो. तुम्हाला माहिती आहे असे अनोखी परंपरा असलेले गाव…

 

नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या छत्तीसगड येथील बस्तर जिल्ह्यातील गोंड आणि मुरिया जमात प्रामुख्याने आढळते. यांच्यातील परंपरा आणि रितीरिवाज अन्य जगापेक्षा भिन्न आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत डेटींग आणि रोमांस सारख्या गोष्टी खाजगी असून लपून छपून केल्या जातात. सार्वजनिकरित्या या अशा गोष्टींवर उघडपणे बोलणे देखील वाईट मानले जाते. परंतू या जमातीत ही सर्वसामान्य बाब आहे.

 

१० वर्षांच्या वरील मुले देखील सामील

या गावात आवडत्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे कोणतीही नवीन बाब नाही. या संबंधांसाठी गावात विशेष घरे बनविलेली असतात, या परंपरेला एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरे केले जाते. या डेटिंग परंपरेला ‘घोटुल’ असे म्हटले जाते. येथे बांबूपासून तयार झालेल्या घरात असा प्रकार केला जातो. त्या घरात सर्व सोयी सुविधांची रेलचेल असते. आजकाल शहरात असलेल्या पब आणि नाईटक्लब सारखा हा ‘घोटुल’ प्रकार या जातीजमाती साठी खास सण आहे. या जमातीतील तरुण आणि तरुणी येथे आणि एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी येथे भेटतात आणि पार्टी करतात. त्यांच्या परंपरेनुसार १० वर्षांच्या वरील मुले देखील यात सामील होऊ शकतात.

 

जीवनसाथी निवडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य

‘घोटुल’ मध्ये कोणताही मुलगा आपल्या आवडत्या मुलीला प्रपोज करू शकतो. जर मुलगी देखील त्याला पसंद करीत असेल तर ते एकत्र राहू शकतात. लग्नाआधी ते एकमेकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात. एवढेच काय तर अनेक लोकांसोबत ते संबंध ठेवू शकतात. येथे तरुण आणि तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणताही सामाजिक दबावाशिवाय ते येथे राहू शकतात.

 

जेव्हा त्यांना आपला निर्णय योग्य आहे अशी खात्री पटते तेव्हा ते आपल्या कुटुंबाला सांगतात, त्यानंतर त्यांचे लग्न लावून दिले जाते. येथे गर्भवती राहिल्यानंतरही लग्न करणे सर्वसामान्य घटना आहे. या परंपरेचे अनेक फायदे असल्याचे येथील सर्वसामान्य लोक म्हणतात. यामुळे लैगिंक संबंधासंबंधीचे गैरसमज दूर होतात,तसेच जमातील लैगिंक शोषणाच्या घटना देखील कमी घडतात.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button