“जरांगेला अटक करा, अनेक जणांकडे रिव्हॉल्वर…”, OBC नेते नवनाथ वाघमारेंनी सगळंच सांगितलं
मराठा समाजला कुणबी म्हणून आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आज 25 जानेवारीला जरांगेंनी उपोषण सुरु केलं आहे.
परंतु, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले असून त्यांना अटक करण्याची विनंती पोलिसांनी केली आहे. नवनाथ वाघमारे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “जरांगेच्या आंदोलनाच्या ठिकाणी अनेक शस्त्रधारी लोक येत असतात. लाठीचार्जच्यावेळी पोलिसांवर ज्या लोकांनी हल्ले केले, त्यावेळी अनेक जणांकडे रिव्हॉल्वर सुद्धा होते. म्हणजेच जरांगेचे समर्थक हे झुंडशाही करणारे गुंड आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आढळून येऊ शकतात. त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, जरांगेच्या आंदोलनाला बंदी घालावी”.
नवनाथ वाघमारे जरांगेवर आरोप करत म्हणाले, “जरांगेची क्रेझ कमी झाली. जरांगेची लोकप्रियता कमी झाली की जरांगे नवीन कायतरी आणून त्यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा जरांगेचा केविलवाणा प्रयत्न आहे. जरांगेवर सध्या जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे, शस्त्रबंदीचे आदेश आहेत. त्यामुळे जरांगेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. जमावबंदी केल्याप्रकरणी जरांगेंना अटक झाली पाहिजे. परंतु, राज्य सरकार जरांगेला पाठिशी घालत असल, तर जरांगेवर गुन्हे दाखल होणार नाहीत. राज्य सरकारला लोकशाही मार्गाने देश, राज्य, जिल्हा चालवायचा असेल, तर जरांगेवर गुन्हा दाखल होऊन जरांगेला अटक होईल असं आम्हाला वाटतं.
वाघमारे पुढे म्हणाले, सामूहिक आंदोलन आहे, त्यामुळे अनेक लोक एकत्र येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश आहेत. जरांगेच्या आंदोलनाच्या ठिकाणी अनेक शस्त्रधारी लोक येत असतात. लाठीचार्जच्यावेळी पोलिसांवर ज्या लोकांनी हल्ले केले, त्यावेळी अनेक जणांकडे रिव्हॉल्वर सुद्धा होते. म्हणजेच जरांगेचे समर्थक हे झुंडशाही करणारे गुंड आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आढळून येऊ शकतात. त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की, जरांगेच्या आंदोलनाला बंदी घालावी. तत्काळ जरांगेला समज द्यावी आणि उपोषणापासून थांबवावं. अन्यथा येणाऱ्या काळाता आम्हाला सुद्धा यामध्ये दाद मागावी लागेल की, जिल्ह्यात जमावबंदी असताना जरांगेला उपोषण करायला परवानगी मिळत असेल, तर जरांगेच्या इशाराऱ्यावर राज्य चालतंय का? यासाठी आम्हाला दाद मागावी लागेल.
राज्य सरकार ओबीसींच्या पाठिंब्याने मजबूत सरकार झालं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की हे सरकार आणि मुख्यमंत्री ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसणार नाहीत. ओबीसींची दिशाभूल करणार नाहीत. त्यामुळे उपोषण करून समाजाला वेड्यात काढायचं आम्हाला योग्य वाटत नाही. उपोषण करून सरकारला वेठीस धरणं आम्हाला योग्य वाटत नाही, असंही नवनाथ वाघमारे म्हणाले.