VIDEO : वाल्मिक कराडची आणखी एक दुकानदारी उघड? बीडमध्ये सापडला छुपा दारू कारखाना …
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या बीडच्या कारागृहात मुक्कामी आहे. पण त्याचे रोज नवनवीन कारनामे बाहेर येत आहे. मागील काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराडबद्दल अनेक प्रकार समोर आणले आहे.
अशातच आता बीडमध्ये कराडच्या निकटवर्तीयाचा चक्क देशी दारूचा कारखाना असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये एका देशी दारूच्या कारखान्याचा व्हिडीओ समोर आणला आहे. अंबाजोगाई येथील बूटनाथ तलाव या ठिकाणी एक दारूचा कारखाना होता. हा कारखाना वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयाचा असल्याचा आरोप दमानिया यांनी केली आहे.
‘बूटनाथ तलाव या ठिकाणी एक दारूचा कारखाना होता. ज्यामध्ये अवैद्य रिक्त दारू निर्मिती केली जात होती. रंगनाथ जगताप या अधिकाऱ्याने व उत्पादन शुल्क विभाग सदरील कारखान्यावर कारवाई केली होती. परंतु तो कारखाना वाल्मिक कराडच्या निकटवर्ती याचा असल्याचं समोर आलं. त्यामुळे कारवाई केल्यानंतरही या कारखान्यावर कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही.
उलट आरोपींना मोकाट सोडून देण्यात आलं, असा आरोप दमानियांनी केला. तसंच, या कारखान्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे, यावर बीड पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.