आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही, आर्य चाणक्य काय म्हणतात?
आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, रणनीतिकार, आणि कूटनीतितज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरत आहे. या ग्रथांमध्ये व्यक्तीनं आदर्श जीवन कसं जगावं, आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात, कधी कराव्यात, काय गोष्टी करू नयेत.
राजानं कसं असावं, प्रजेनं कसं असावं. अर्थ नियोजन उत्तम पद्धतीनं कसं करावं अशा एक ना अनेक गोष्टींचं मार्गदर्शन या ग्रथांमध्ये करण्यात आलं आहे. चाणक्य नीतीमध्ये आर्य चाणक्य यांनी असे पाच नियम सांगितले आहेत, ज्या नियमांचं पालन केलं तर व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधीच पैशांची कमी भासणार नाही असं चाणक्य म्हणतात. जाणून घेऊयात या नियमांविषयी
दान- पुण्याची भावना – आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या घरातील सदस्य एखाद्या संकटात सापडलेल्या माणसाला मदत करतात. आपल्याकडे एखादी वस्तू गरजेपेक्षा जास्त आहे, ती इतरांना देण्याची भावना ठेवतात, त्या घरात सदैव वैभव नांदतं, पैशांचा ओघ सुरू राहातो. त्यामुळे व्यक्तीला आपल्या कुवतीनुसार दान पुण्य करायला हवं असं चाणक्य म्हणतात.
घराची स्वच्छता – शास्त्रात देखील सांगितलं आहे, की जे घर स्वच्छ असतं. ज्या घराची साफ -सफाई दररोज केली जाते. त्याच घरावर लक्ष्मी माता प्रसन्न राहाते. त्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. पैशांचे नवे -नवे स्त्रोत प्राप्त होतात.
अन्नाची बचत – आचार्य चाणक्य यांनी सागिंतल्यानुसार ज्या घरात अन्नाचा अपमान होतो, त्या घरावर लक्ष्मीची देखील कृपा राहात नाही, मात्र ज्या घरात अन्नाचा सन्मान केला जातो. त्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव राहातो. त्यामुळे अन्नाची नासाडी टाळावी
पाहुण्यांचा सत्कार – आचार्य चाणक्य म्हणतात ज्या घरात पाहुण्यांचा आदर सत्कार केला जातो. ज्या घरात पाहुण्यांना देव समज जातं, त्या घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. त्या घरात कधीच पैशांची कमतरता भासत नाही. त्यामुळे पाहुण्यांचा योग्य सत्कार झाला पाहिजे.
संयम आणि शिस्त – आर्य चाणक्य म्हणतात आयुष्यात संयमाला खूप महत्त्व आहे. जर तुमच्या आयुष्यात शिस्त आणि संयम असेल तर तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासत नाही.