आरोग्य

पायांच्या नसा सतत ब्लॉक होतात? मग ‘हे’ सोपे उपाय करून मिळवा आराम, पायांच्या वेदनांपासून सुटका


सततच्या धावपळीमुळे अनेकदा आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. नेहमी नेहमी काम करत राहिल्यामुळे हातपाय दुखणे, गुडघे दुखी, कंबरदुखी इत्यादी आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.

त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी आहारात बदल करून शरीराला पचन होणाऱ्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये हातापायांमध्ये मुंग्या येणे, पायाच्या नसा ब्लॉक होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. पायांच्या नसा ब्लॉक होण्यामागे अनेक कारण आहेत. पायांच्या नसा ब्लॉक होण्यास सुरुवात झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे, कारण हे हृदयविकाराचा झटका येण्यामागचे महत्वपूर्ण कारणं आहे

पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. अन्यथा मोठे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. पण पायांच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर गंभीर समस्या नसल्यास घरगुती उपाय करून आराम मिळवावा. आज आम्ही तुम्हाला पायांच्या ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास पायांच्या नसा ब्लॉक होणार नाहीत.

पायाच्या अडकलेल्या नसा मोकळ्या करण्यासाठी गरम पाण्यात पाय ठेवून बसावे. यामुळे पायांच्या नसा मोकळी होतील आणि इतर गंभीर समस्या उद्भवणार नाहीत. गरम पाण्यात पाय ठेवल्यामुळे पायाला आलेली सूज कमी होते, शिवाय पायांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. पायांच्या सर्व वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्यात पाय ठेवून बसावे.

 

शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात कॅल्शियम, फायबर, लोह आणि सोडियम युक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळं, संपूर्ण धान्य इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरचा वापर केल्यामुळे पायांच्या अडकलेल्या नसा मोकळ्या होण्यास मदत होईल. यासाठी एक चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगर कापसावर घेऊन पायांच्या नसांवर लावून घ्या. यामुळे काही तासांमध्ये फरक दिसून येईल. या पदार्थाच्या मदतीने वैरिकास व्हेन्सची समस्या कमी होते आणि आराम मिळतो.

 

आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. यासाठी टोपात पाणी गरम करून आलं किसून टाका. त्यानंतर पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून त्यात मध मिक्स करून घ्या. यामुळे पायांच्या नसा मोकळ्या होतील आणि आराम मिळेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button