सरपंच हत्या प्रकरण ट्वीस्ट, तपास अधिकारी बदलला, बीडमध्ये नेमकं घडतंय काय ?
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहे. अशात आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडवर मोक्का लागताच सीआयडी मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. प्रशासनाकडून तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. मात्र आता त्यांच्या जागी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील याचा तपास करणार आहेत.
खरं तर, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह नऊ जणांवर मकोका लावला आहे. यात सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा लिडर दाखविले आहे, तर वाल्मीक कराडला गँगचा सदस्य म्हटलं आहे. तसेच या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजुला मकोका लागताच सीआयडीचे तपास अधिकारीदेखील बदलण्यात आले आहेत.
हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. त्यांच्या जागी आता अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील हे तपास करणार आहेत. सीआयडीमध्ये अचानक मोठे बदल केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध सीआयडी घेत आहे.