धार्मिक

अघोरी, नागा साधूंचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मृतदेहाचं काय करतात?


उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ २०२५ मध्ये आखाडे आणि संत आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. विशेषतः महाकुंभात वेगळे ओळखले जाणारे नागा साधू. अंगावर राख लावलेल्या नागा साधूंचा हा गट पूर्णपणे वेगळा दिसतो.

या संतांचे संपूर्ण जीवन अनेक रहस्यांनी भरलेले आहे. हे नागा साधू कुठे राहतात हे कोणालाही माहिती नाही. नागा साधूंचे गट महाकुंभात येतात आणि दुसरीकडे कुठेतरी गायब होतात. आजच्या भागात आपण नागा साधूंचे अंतिम संस्कार कसे केले जातात हे जाणून घेऊ. नागा साधूंचा गट का तयार करण्यात आला?

 

अघोरचा अर्थ असा आहे की, ज्याला घोर नाही असा किंवा ज्याची भीती वाटत नाही असा. ज्यामध्ये कोणताही भेदभाव नाही. अघोर होण्याची पहिली स्थिती आहे की, आपल्या मनातून घृणा काढून टाकणे. सातव्या शतकात सम्राट हर्षवर्धनचे राजा होते. तेव्हा भारतात चीनी तीर्थयात्री ह्वेन त्सांगने आपल्या संस्मरणमध्ये अघोरी आणि नागा साधुंचा उल्लेख केला आहे. ते आश्चर्याने लिहितात की, वायव्य भारतातील बौद्ध लोक नग्न तपस्वी म्हणून राहत होते आणि स्वतःला राखेने झाकत होते. ते डोक्यावर हाडांचे हार घालायचा. तेव्हा ह्वेन त्सांगने त्यांना कापालिक ही पदवी किंवा कोणतेही विशिष्ट नाव दिले नाही.

 

कसे होतात अंत्यसंस्कार?

नागा साधुंचे हिंदू धर्मात मोठे स्थान आहे. कठोर तपस्या, साधं राहणीमान आणि अद्वितीय परंपरासोबत जीवन जगू लागतात. नागा साधूंचं अंत्यसंस्कार सामान्य लोकांप्रमाणे होत नाही. सामान्य अंत्यसस्काराची प्रक्रिया न होता यांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या पद्धतीत केले जातात. जसे की, जल समाधी किंवा भू समाधी घेतली जाते.

भू समाधी म्हणजे काय?

जेव्हा कोणत्याही नागा साधूचे निधन होते तेव्हा त्यांच्या संपूर्ण शरीराला सन्मानाने सजवलं जातं. नंतर पवित्र गंगाजल किंवा इतर पवित्र नदीमधून पाणी आणून स्नान घातली जाते. नंतर नागा साधू यांचं शरीर सामान्य मुद्रेत ठेवले जाते. नंतर याच स्थितीत शरीराला समाधी स्थळावर ठेवले जाते. समाधी स्थळ आगाऊ तयार केले जाते, यासाठी नागा साधूंच्या स्थितीनुसार समाधी स्थळावर खड्डा खोदला जातो. साधूच्या दर्जानुसार खड्डा मोठा आणि खोल असेल. यानंतर, मंत्रांचा जप आणि पूजा करताना, साधूचे शरीर खड्ड्यात ठेवले जाते आणि खड्डा मातीने भरला जातो.

जलसमाधी कशी केली जाते?

जर एखाद्या नागा साधूने शरीर सोडण्यापूर्वी त्याच्या शरीराला एखाद्या पवित्र नदीत, विशेषतः गंगा नदीत जलसमाधी देण्याची इच्छा केली तर अशा परिस्थितीत साधूला पाण्याला समर्पित केले जाते. कोणत्या साधूला कोणती समाधी दिली जाईल हे देखील आखाड्यावर अवलंबून असते. जल समाधीसाठी, प्रथम मंत्रांचा जप आणि हवन केले जाते आणि नंतर नागा साधूंचे शिष्य आणि त्यांच्या आखाड्यातील साधू मृत साधूंच्या इच्छेनुसार त्यांना जल समाधी देतात.

अंत्यसंस्कार अग्नीचा वापर का केला जात नाही?

खरंतर, नागा साधूंचा असा विश्वास आहे की, त्यांचे शरीर पंच महाभूतांनी म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु आणि आकाश यांनी बनलेले आहे आणि जीवनाच्या समाप्तीनंतर त्यांचे शरीर केवळ या तत्वांमध्येच लीन झाले पाहिजे. अशाप्रकारे, जेव्हा नागा साधू मरतात तेव्हा त्यांना भूसमाधी किंवा जलसमाधी दिली जाते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button