क्राईम

जेलमधून बाहेर आला अन् कोयत्याने तिघांना तोडला; नेमकं काय घडलं?


पुणे : झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई केल्यानंतर वर्षभर कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे.

 

एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, महेश गजसिंह हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. कोंढवा पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएनुसार कारवाई केली होती. एक महिन्यापुर्वीच तो कारागृहातून बाहेर आला आहे. दरम्यान महेश व जखमी यांच्यात शाब्दीक वादावादी झाली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास तक्रारदार व त्यांचे मित्र गप्पा मारत बसले असता आरोपी त्याठिकाणी घातक हत्यारे घेऊन आले.

 

अमित परदेशी याच्या डोक्यात तसेच हनुवटीवर वार करून गंभीर जखमी केले. तर, तक्रारदाराला उलट्या कोयत्याने मारहाण केली. सोहेश याच्यावर देखील आरोपींनी सपासप वार करून गंभीर जखमी केले. नंतर चौघांनी अजय पवार याच्यावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button