Manoj Jarange Patilराजकीय

कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस


छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगेला जातीच्या आरक्षणाशी काहीही देणेघेणं नाही. जरांगे हा हिंदुत्त्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे, अशी जहरी टीका कालीचरण महाराज यांनी केली. मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठा आरक्षण आंदोलनाचा जोरदार फटका बसला होता.

या पार्श्वभूमीवर रविवारी कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना आक्रमक भाषेत लक्ष्य केले.

 

राजा कसा असला पाहिजे, हे लोकं निवडून देतात. पण हिंदू लोक मतदानाला जात नाहीत. मग राजा कोण येणार, तो म्हणजे मुस्लिमांचे तळवे चाटणारा. आता एक आंदोलन सुरु झालं होतं माहिती आहे ना, हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं. कशी हवा होती त्या आंदोलनाची, लाखो लोक मुंबईत आले होते. त्यांच्या नेत्याने थडग्यावर चादर चढवली. यामध्ये जातीपातीच्या आरक्षणाच्या काही गोष्टी नाहीत. यांचा नेता हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस आहे राक्षस, अशी टीका कालीचरण महाराज यांनी केली.

 

आपण मतदानासाठी जात नाही. त्यामुळे मुस्लिमधर्जिणे लोक राजा बनू लागले आहेत. मुसलमानांना खुश करण्याचा प्रयत्न होत आहे, कारण ते मतदानात सहभागी होतात. मौलाना एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन करतात. सर्व आमदार-खासदार मुस्लिमांचे तळवे चाटतात. मी तुम्हाला तुकडे टाकेल, मग लाडकी बहीण योजना, रोजगार देऊ, असे तुकडे टाकून तुम्हाला खुश ठेवू. फुकटात काहीतरी तुकडे टाकायचं असे सर्वच राजकीय पक्ष वापरतात. फुकटात वापरणाऱ्या लोकामध्ये सर्वात जास्त मुस्लिम (Muslim) असतात. पण ज्यांची कातडी सोलली जाते ते हिंदू आहेत, असे वक्तव्य कालीचरण महाराजांनी केले.

 

हिंदूंचं हित पाहणाऱ्यांनाच मतदान करा; कालीचरण महाराजांचं आवाहन

जो हिंदू हितकी बात करेंगा त्यालाच मतदान करा. जागो जागी पाकिस्तान बनला आहे, जेवढे मुसलमान एरिया आहे तिथे पाकिस्तान बनलं आहे. जादूटोणा करून रोज 40 हजार मुली पळवतात. 100 टक्के अहिंसा संभव नाही. हिंसा करावीच लागते, त्यामुळे सर्व देव देवी हिंसक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म रक्षणासाठी राक्षस मारले, असेही कालीचरण महाराजांनी म्हटले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button