मौलाना सज्जाद नोमानींना भेटून मनोज जरांगेंची मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशनची तयारी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लढायचं की नुसतच पाडायचं याचा निर्णय आज देणाऱ्या मनोज जरांगे यांनी मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेऊन मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशनची तयारी चालवली आहे.
यातून हिंदू एकजुटीच्या मतांमध्ये सेंधमारी करायचा त्यांचा डाव असल्याचे समोर आले आहे.
जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातून जशी मराठा समाजाची एकजूट झाली, त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला. त्याला तोड काढण्यासाठी ओबीसी समाजाची सुद्धा एकजूट होऊ लागली. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसू द्यायचे नाही, अशी जिद्द ओबीसी समाजाने बाळगून मनोज हाके यांनी मोठमोठे मेळावे घेतले. त्याचा परिणाम विधानसभेत दिसू शकतो, याचा अंदाज येताच मनोज जरांगे आणि त्यांचे “सल्लागार” वेगळ्याच कामाला लागले. त्यांनी मराठा + मुस्लिम आणि महार अशा एकजुटीची तयारी चालविल्याचे प्रयत्न समोर दिसायला लागले. मौलाना सज्जाद नोमानी यांची जरांगे यांनी भेट घेणे आज प्रयत्नांचा भाग असल्याचे मानले जात आहे.
वास्तविक आपली विधानसभेचे निवडणूक वाचावी, किमान आपल्या मतदारसंघात तरी कुठला त्रास होऊ नये, यासाठी सर्व पक्षांचे नेते आणि इच्छुक मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या घरी जाऊन भेटले, पण मनोज जरांगे स्वतः मात्र मुस्लिम धर्मगुरूच्या दारी गेले. त्यांनी अंतरवाली सराटीतून छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन मुस्लिम धर्मगुरू ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल नाव बोर्डाचे अध्यक्ष प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. त्यांच्याशी दोन तास चर्चा केली.
मनोज जरांगे यांनी उभ्या केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा धसका घेत सर्वपक्षीय नेत्यांनी अंतरवाली सराटी मध्ये जाऊन जरांगे यांच्या भेटी घेतल्या. या बहुतांश भेटी रात्रीच्या होत्या. यामध्ये राजेश टोपे, रोहित पवार पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण आदी प्रमुख नेत्यांचा समावेश होता. त्यातही राजेश टोपे त्यांना नियमित भेटत राहिले. मनोज जरांगे यांनी सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले असले, तरी मध्यंतरी त्यांनी फडणवीस यांची देखील मध्यरात्रीनंतर फोनवरून चर्चा केली होती.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या धाकाने सर्व पक्षाने त्यांना अंतर्वली सराटी मध्ये खेचून आणणारे मनोज जरांगे स्वतः मात्र मुस्लिम धर्मगुरुला भेटायला गेले. त्यांनी मौलाना सज्जाद नोमानी यांच्याशी दोन तास चर्चा केली. यातून हिंदू मतांमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा डाव उघड झाला.
काँग्रेस आणि समाजवादी समर्थक मौलाना
कारण सज्जाद नोमानी हे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांचे समर्थक मानले जातात. अखिलेश यादव यांच्या पिछडा + दलित + आदिवासी अर्थात “पीडीए” फॉर्म्युलाला नोमानी यांनी पाठिंबा दिला होता. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात “पीडीएफ” फॉर्म्युला राबवून हिंदू मतांमध्येच फूट पाडली होती. मौलाना सज्जाद नोमानी यांचा वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध आहेच, पण मोदी, शाह, भागवत हे मुसलमानांचे “भाई” आहेत. ते चुकीचे काही करणार नाहीत, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला होता. काशीमधील ज्ञानवापी वरील मुस्लिमांचा ताबा सोडायला ते तयार नाहीत.
मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशनची तयारी
पण सज्जाद नोमानी हे मुस्लिम विद्वान आहेत. त्यांच्या समाजात त्यांचे वेगळे वजन आहे. अशा माणसाला भेटायला गेल्यानंतर त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यांनी विचार करण्यासाठी दोन दिवस मागितले आहेत. ते दोन दिवसांत राज्यातल्या मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा करून आपला निर्णय सांगतील, पण एक वेगळा समीकरण उभे राहिले पाहिजे. त्यानंतरच सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी या भेटीनंतर केले. याचा अर्थ मनोज जरांगे हे मुस्लिम + मराठा कॉम्बिनेशन उभे करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले. त्याचवेळी हिंदू एकजुटी विरोधात काम करून ओबीसी संघटन देखील खिळखिळे करायचा डावही या निमित्ताने समोर आला.