राजकीय

भगवान गडावरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंची शेरोशायरी


गोपीनाथ मुंडे यांची कन्या, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील भगवान गडावर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याची सुरुवात आणि शेवट पंकजा मुंडे यांनी शेरोशायरीने केला. पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामागारांचे प्रश्न या दसरा मेळाव्यात मांडले.

 

या मेळाव्याला १८ पगड जातीचे लोक आले की नाही,. नाशिकहून आले का, नगरहून आले का, बुलढाण्याहून आले का, आता कुठून कुठून आले गंगाखेड, जिंतूर परभणी नांदेड, अकोला अमरावती पुणे पिंपरी चिंचवड आले का …. सगळ्या राज्यभरातून आलेले बांधव. तुम्हाला मी दरवर्षा साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ’ या शायरीने पंकजा मुंडेंनी भाषणाची सुरुवात केली.

तुम लाख कोशिश करो, हमे हराने की,

हम जबजब बिखरेंगे, दुगनी रफ्तार से निखरेंगे

इन्सान की जाती, फिर भी मुश्किल जीना जीते है

जातीभेद और पिछडेपण का नित्य जहर जो पिते है

उन पिछडोने अपनाया मुझको, मै उनकी रोजीरोटी हूँ

मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ

पिछडों का दर्द मैने, अपना दर्द माना है

उनका सहारा मैने मन में ठाना है

कमजोर हो जो चल ना सके

मै उनके हाथ की लाठी हूँ

मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ

मी गरीबांसाठी काम करणारी आहे. राजकारणाला चिटकून बसणारी नाही. पाच लेकरांनी जीव दिला. त्या आमदारकीचं काय गोड वाटणार आहे. आमदारकी खासदारकी काही नव्हती, तरीही पाच वर्ष तुम्ही आला. उद्याही याल. आपल्याकडे काही असो नसो मी तुमच्या मागे येणारच. जो वंचित आहे. ज्याची पत आणि ऐपत नाही. अशा लोकांसाठी मी राजकारणात आहे. गाड्या घेण्यासाठी नाही. टेबलाखालून पैसे घेण्यासाठी नाही. तुम्ही म्हणता म्हणून मी हेलिकॉप्टरने येते. तुम्ही म्हटला तर बैलगाडीतून येईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

‘अब चलू मै अपनी चाल पे’ म्हणत पंकजा मुंडे यांनी भाषणाचा समारोप केला.

“अब जो भी होगा मै देखुंगी,

जो लिखा काल के भाल पर,

कांटे हो या हो अंगारे,

अब चलू मै अपनी चाल पे

एक बहन थी माता है

अब काली बहन की लौटी हूँ

मै गौपीनाथ मुंडे की बेटी हूँ”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button