देश-विदेश

Ratan Tata : रतन टाटा अमर रहे… पोलिसांच्या फैरी, दिग्गजांची उपस्थिती; वरळीतील स्मशानभूमीत लिंजेंडवर भावूक वातावरणात अंत्यसंस्कार


भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांचे बुधवारी (दि.10) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. आज त्यांच्यावर वरळीतील पारसी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रार्थना सभागृहात पारसी पद्धतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनेक मान्यवरांचा अश्रूंचा बांध फुटला

दरम्यान, रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. ब्रीचकँडी रुग्णालयात निधन झाल्यानंतर रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या NCPA मध्ये सकाळी 10 ते दुपारी चार पर्यंत ठेवण्यात आले होते. यावेळी रतन टाटा विविध धर्मातील धर्मगुरुंनी अंत्यदर्शन घेतले. टाटांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या अनेकांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला.

सर्व क्षेत्रातील लोकांकडून रतन टाटांचे अंत्यदर्शन

राजकीय, मनोरंजन आणि सर्वच क्षेत्रातील लोकांनी मुंबईत रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या सर्वांनी रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेतले. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, दिग्दर्शक मधू भांडारकर, ईशा अंबानी, आनंद पिरामल यांनी देखील रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.

 

रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.10) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे राज्यात आज शासकीय कार्यालयांवरिल ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले होते. त्याशिवाय मनोरंजन आणि करमणुकीचे कार्यक्रम देखील आज होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते.

 

रतन टाटांना भारतरत्त द्या, राज ठाकरेंनी पीएम मोदींकडे मागणी

राज ठाकरे पीएम मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हणाले, ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे , तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button