क्राईम

रात्र होताच सुनेच्या बेडरूममध्ये जायचा सासरा; 10 वर्ष सासू गप्प राहिली, पण शेवट…


सासऱ्याचे सुनेशी अनैतिक संबंध होते. सासूने खूप वर्षं विरोध केला; मात्र एक वेळ अशी आली की तिला हे सहन झालं नाही आणि तिने जीवन संपवलं. ही घटना बिहार राज्यातल्या जमुईमध्ये घडली आहे.

ही महिला सासरा-सुनेच्या अनैतिक संबंधांना विरोध करत होती; मात्र यात तिला जीव गमवावा लागला. संपतिया देवी असं मृत महिलेचं नाव आहे. या महिलेचा पती, मुलगा आणि सुनेने छळ केला. सासरा-सुनेच्या संबंधांना विरोध केल्याने हे तिघे तिला मारायचे, त्यामुळे ती मुलींकडे राहत होती. कधी तरी ती घरी यायची. या वेळी आल्यावर तिने या दोघांच्या संबंधांना विरोध केला, यानंतर तिला सर्वांनी मारहाण केली. यामुळे कंटाळलेल्या संपतिया देवीने जीवन संपवलं. या घटनेनंतर महिलेचा पती, मुलगा आणि सून फरार आहेत.

झाझा पोलीस स्टेशन हद्दीतल्या बलियोडीह गावातली ही घटना आहे. मृत संपतिया देवीचा (55 वर्षं) पती बलदेव यादव याचे त्याच्या सुनेशी 10 वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत, असा आरोप आहे. पती आणि सून यांच्यातल्या अनैतिक संबंधांमुळे संपतिया देवी तणावात होती. ती त्याला हे सगळं थांबवायला सांगत होती; पण तो उलट तिलाच मारहाण करत होता. इतकी वर्षं ती ही गोष्ट सहन करत होती; पण आता हे सारं असह्य झाल्याने तिने विषप्राशन करून आयुष्य संपवलं. मृत महिलेच्या मुलीने ही हत्या असल्याचा आरोप केला आहे.

ललिताने आईच्या मृत्यूला वडील, भाऊ आणि वहिनीला जबाबदार धरलं आहे. या तिघांनी आईला विष देऊन मारलं असा तिचा आरोप आहे. ‘अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे ते आईला मारहाण करायचे. तिला जेवू घालत नव्हते. या वेळी मारहाण करून तिला विष पाजून मारहाण केली आणि सगळे पळून गेले’, असा आरोप ललिताने केला.

पोलिस स्टेशन प्रभारी संजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपतिया देवीने सुनेशी वाद झाल्यावर विषप्राशन करून जीवन संपवल्याचं प्राथमिक तपासात आढळलं आहे. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जमुई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button