“भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य झाला पाहिजे”
“भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य झाला पाहिजे. त्याच बरोबर, जर्मनी, ब्राझील, जपान या देशांना देखील हे सदस्यत्व दिली गेले पाहीजे.”,असे मत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी व्यक्त केले.
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. बदलणाऱ्या जगाचे स्वरुप पाहता, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही जास्तीतजास्त सर्वसमावेशक आणि अधिक अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करणारी असली पाहीजे, असे सुद्घा मॅक्रॉन म्हणाले.
याच बरोबर परिषदेच्या कार्यपद्धती मध्ये सुद्घा परिवर्तन करावे लागेल, जागतिक स्तरावर शांताता प्रस्थपित करण्यासाठी अधिक क्रियाशील होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. रशिया युक्रेन युद्ध,गाझा पट्टी मधील संघर्ष या पार्श्वभूमीवर, संयुक्त राष्ट्र संघात परिवर्तन करण्याची मागणी करण्यात येत आहे.
भारताचा समावेश करण्याची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरीकेच्या दौऱ्यानंतर भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्व मिळण्याची मागणी जोर धरु लागली आहे. जपान आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांनी सुद्धा या मागणीला दुजोरा दिला आहे. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केलेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता राखण्यासाठी भारताच्या योगदानाची प्रशंसा केलेली आहे. सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत केवळ ५ देश कायमस्वरुपी सदस्यं आहेत, ते म्हणजे अमेरिका, चीन,फ्रान्स,रशिया आणि इंग्लंड. चीन वगळता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराला सर्व राष्ट्रांनी पाठिंबा जाहीर केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विद्यामान रचनेवर जगभरातून टिकेची झोड उठत आहे.