Video: महिलेला खांद्यावर घेऊन धावतच सुटली…’, महिला पोलिसाचा ‘तो’ Video नेमका काय?
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात, काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही खूपच आश्चर्यचकीत करणारे असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओत नाशिक पोलीस (Nashik Police) दलातील एका महिला पोलिसाने (women Constable) एका महिलेचे प्राण वाचवले आहे. तिच्या कामगिरीचे आता संपूर्ण शहरभर कौतुक होत आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. (nashik police cop rescues unconscious women by carrying her on her shoulders video viral nashik adivasi morcha pesa meeting tribal protest)
व्हायरल व्हिडिओत काय?
आदिशक्ती तू, झाशीची राणी तू
जगत जननी तू, मावळ्यांचा भवानी तूA young woman fell unconscious during an ongoing morcha today. Our Superwoman – Amaldar Manisha Sonawane without wasting a single moment, carried the woman on her shoulder and ran towards the nearest police vehicle.… pic.twitter.com/22pZugE8cD
— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) August 28, 2024
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक महिला बेशुद्ध झालेली दिसते आहे. या महिलेला दोन महिला पोलिसांनी पकडून धरले आहे. त्यातल्या एका महिलेने बेशुद्ध झालेल्या महिलेला खांद्यावर उचलले आहे. त्यानंतर ती महिला पोलीस खांद्यावरून त्या महिलेला पोलीस व्हॅनपर्यंत नेते. त्यानंतर पोलीस व्हॅनमध्ये बसलेल्या इतर महिला कॉन्स्टेबल तिला व्हॅनमध्ये नेतात, असे व्हिडिओ दाखवण्यात आले आहे. त्यामुळे महिलेला शुद्धीवर आणण्यासाठी तिला कदाचित रूग्णालयात नेल्याची माहिती आहे.
दरम्यान महिला पोलीस कर्तव्य बजावत असताना एकाने त्यांचा हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला होता. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून आता महिला पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
त्याचं झालं असं की पेसा क्षेत्रातील उपोषणार्थींना पाठींबा देण्यासाठी बुधवारी आदिवासी विकास भवनासमोर नाशिक जिल्ह्यासह राज्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांनी आदिवासी विकास भवनवर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देऊन परिसर दणाणून सोडला होता.
आदिवासी बांधवांच्या या ठिय्या आंदोलना दरम्यान एका महिलेची अचानक प्रकृती बिघडली होती. यावेळी घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या मनिषा सोनावणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता महिलेला खांद्यावर उचलून तिला पोलीस व्हॅनपर्यंत पोहोचवले. सोनावणे यांनी केलेल्या या कामगिरीचं आता पोलीस दलात कौतुक होतं आहे. तसेच नाशिक पोलीस दलाचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी देखील सोनावणे यांचे कौतुक केले आहे.