कोलकाता प्रकरणातील आरोपीच्या सायको चाचणीत धक्कादायक खुलासा, मनोवैज्ञानिकही हादरले !
Crime News : कोलकाताच्या आरजी कर रुग्णालयात एका डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण देश हादरला.रस्त्यापासून दिल्लीच्या संसदेपर्यंत सगळीकडे हा मुद्दा गाजला.
सर्वांनी यावर संताप व्यक्त केला. बलात्कारासारखा प्रकार करणे आणि त्यानंतर खूप भीषण पद्धतीने हत्या करणे, असं दुष्कृत्य करणारा मनूष्य असूच शकत नाही, असे सर्वजण म्हणू लागले. यानंतर आरोपी संजय रॉयच्या फाशीचा दोर आणखी जवळ आलाय. दरम्यान संजय रॉयचा मनौवैज्ञानिक रिपोर्ट समोर आलाय. त्याचा हा रिपोर्ट पाहणाऱ्यांना धक्का बसतोय. असं काय आहे या रिपोर्टमध्ये? यावर डॉक्टरांची प्रतिक्रिया काय? हे सर्व जाणून घेऊया.
विकृती आणि क्रूरता
आरोपी संजय रॉयच्या रिपोर्टमध्ये त्याला पशूची व्याख्या देण्यात आली आहे. संजय रॉय हा एक लैंगिक विकृतीने ग्रस्त व्यक्ती आणि त्याची मानसिक स्थिती खूपच खतरनाक आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. हा व्यक्ती बाहेरुन सामान्य वाटतो पण त्याच्या आत भरलेली क्रूरता आणि विकृती खूप घाबरवणारी आहे. आरोपी संजय रॉयच्या सायकोलॉजिकल प्रोफाइलचा सखोल तपास करण्यात आलाय. रिपोर्टनुसार, संजय रॉयने आपली विकृती आणि क्रूरता उघडपणे स्वीकारली आहे. त्याच्यामध्ये कोणतीही लाज, शरम, पश्चातापाची भावना उरलेली नाही, असे मनोवैज्ञानिक सांगतात. आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल तो अगदी निसंकोचपण सांगत होता. याबद्दल त्याच्या मनात कोणत्याही प्रकारच्या पश्चातापाचे संकेत नव्हते.
सीबीआयने मागितली पॉलीग्राफी टेस्टची परवानगी
कोलकाता बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आलाय. सीबीआयने संजय रॉयच्या पॉलीग्राफी टेस्टची परवानगी मागितली आहे. संजय रॉय परवानगी देत नाही, तोपर्यंत हे शक्य होणार नसल्याचेही सांगण्यात येतंय. आज (शुक्रवार) संजय रॉयला कोर्टात सादर केले जाणार आहे. यावेळी तो पहिल्यांदाच वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देईल. सध्या राज्य सरकारने त्याला आपली भूमिका मांडण्यासाठी एक वकील नियुक्त केला आहे. जो पहिल्यांदाच संजय रॉयला भेटेल.
घटनास्थळी उपस्थित असण्याला दुजोरा
आरोपी संजय रॉय हा घटनास्थळी उपस्थित होता हे सीबीआयच्या तपासात समोर आले होते. दरम्यान या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. संजय रॉयने केलेले विधान, पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्टमुळे याला दुजोरा मिळाला आहे. पीडितेच्या नखातून मिळालेले रक्ताचे सॅम्पल संजय रॉयच्या जखमेंसोबत मिळतेजुळते आहेत. पोलीस आता डीएनए रिपोर्टची वाट पाहतायत.ज्यामुळे या प्रकरणाची दिशा ठरु शकते.
सीसीटीव्ही फुटेज
सीसीटीव्ही फुटेजनुसार संजय रॉय सकाळी 11 वाजता रुग्णालयाच्या आवारात दिसला होता. तो चेस्ट डिपार्टमेंटच्या जवळ फिरत होता आणि ट्रेनी डॉक्टरला पाहत होता. यानंतर साधारण पावणे चार वाजता रुग्णालयाच्या आत घुसताना पाहिला गेला.यावेळी तो डॉक्टरांकडे डोळ्यात डोळे टाकून पाहत होता. या फुटेजमुळे संजय रॉय घटनास्थळी होता, या वृत्ताला दुजोरा मिळतोय. या केससाठी कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन केले जाईल. या प्रकरणाचा निकाल खूप महत्वपूर्ण आहे, असे मत मनोवैज्ञानिकांनी व्यक्त केलंय.