ताज्या बातम्यादेश-विदेश

पाकिस्तानचे 600 सैनिक भारतात घुसले; मोठं युद्ध होण्याची शक्यता ?


भारत आणि पाकिस्तान या कट्टर विरोधी देशांमध्ये युद्ध होण्याची चिन्हे दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा (Amjad Ayub Mirza) यांनी जम्मू आणि काश्मीवर लकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

महत्वाची बाब म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पाकिस्तानचे सुमारे 600 सैनिक कुपवाडा परिसरात घुसल्याचे त्यांनी म्हंटल आहे. स्थानिक जिहादी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानी लष्कराला मदत करत असल्याचंही डॉ. अमजद यांनी सांगितलं आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमझद मिर्झा यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.

अमझद मिर्झा यांचे ट्विट काय?

 

एका संपूर्ण SSG बटालियनने घुसखोरी केल्याचे सांगितले जाते याचा अर्थ कुपवाडा आणि इतर ठिकाणी किमान 600 कमांडो आहेत.

स्थानिक जिहादी स्लीपर सेल सक्रिय आहेत आणि भारतीय हद्दीत SSG चळवळीला मदत करत आहेत.

लेफ्टनंट कर्नल शाहीद सलीम जंजुआ हे सध्या जम्मूच्या भारतीय हद्दीत हल्ल्यांचे नेतृत्व करत आहेत.

त्यांचे लक्ष भारतीय सैन्याच्या 15 कॉर्प्सला गुंतवून ठेवण्यावर आहे.

SSG च्या आणखी दोन बटालियन मुझफ्फराबादमध्ये जम्मू आणि काश्मीर मार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करण्यास तयार आहेत.

एका बटालियनमध्ये सुमारे 500 सैनिक असतात. पाकिस्तानच्या या बटालियन स्थानिक जिहाद्यांच्या मदतीने भारतातही घुसल्या तर पुन्हा एकदा पीर पंजाल डोंगरात कारगिलसारखे युद्ध होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय आहे की, कुपवाडा परिसर पिरपंजाल आणि शामबारी पर्वताच्या मध्ये वसलेला आहे, जो दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्करासाठी लपण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला सावध राहण्याची गरज आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button