America ( अमेरिका ) : ट्रम्प आणि मृत्यूमध्ये फक्त फक्त 2 सेमीचे अंतर… माजी राष्ट्राध्यक्षांच्या रॅलीत नेमकं काय घडलं?
America ( अमेरिका ) : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रम्प पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली घेत असताना अचानक गोळीबार सुरू झाला.
या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ट्रम्प या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आणि गोळी त्यांच्या कानाला लागून गेली. जर गोळी 2 सेंटीमीटर अलिकडून गेली असती तर ट्रम्प यांना आपला जीव गमवावा लागला असता.
हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “त्यांच्या कानातून गोळी गेल्यासारखे वाटले.”
या हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या कानांवर रक्त दिसत आहे. गोळी झाडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प स्वत:चा बचाव करण्यासाठी खाली वाकले, मात्र गोळी केवळ त्यांच्या कानाला लागली आणि ते थोडक्यात बचावले.
या गोळीबारात ट्रम्प जखमी झाल्याचेही वृत्त आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बंदुकीचा आवाज येताच ट्रम्प उजव्या हाताने आपला उजवा कान धरतात, नंतर ते पाहण्यासाठी हात खाली करतात आणि त्यानंतर ते व्यासपीठाच्या मागे गुडघे टेकून बसतात व अमेरिकन सीक्रेट सर्व्हिस एजंटच्या एका गट त्यांना कव्हर करतो. यावेळी ट्रम्प यांच्या कानातून रक्त येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
BREAKING: Donald Trump says in a social media post that he was "shot with a bullet" in the upper part of his right ear and that nothing yet is known about the shooter. https://t.co/ncnUWvBann
— The Associated Press (@AP) July 14, 2024
डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष अमेरिकाआपल्या देशात असे घडू शकते यावर विश्वास बसत नाही. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही, जो आता मृत्यूमुखी पडला आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली होती. ते मला लगेच कळले. काहीतरी गडबड होते असल्याची मला त्यावेशी शंका आली होती कारण मला मोठा आवाज ऐकू येत होता
ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, “माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्व्हेनियातील त्यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षित आहेत त्यामुळे मी निश्चिंत आहे.
गोळीबारानंतर सुमारे दोन तासांनंतर रेहोबोथ बीचवरून बोलताना बिडेन म्हणाले, “अशा प्रकारच्या हिंसाचाराला अमेरिकेत जागा नाही. या प्रकरणावर मी ट्रम्प यांच्याशी लवकरच बोलेण.”
रॅलीत झालेल्या गोळीबाराबाबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विट केले की, “आपल्या लोकशाहीत राजकीय हिंसेला जागा नाही. नेमके काय झाले हे अद्याप आम्हाला माहीत नसले तरी, माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांना गंभीर दुखापत झाली नाही त्यामुळे चिंतेचे कारण नाही.”