Crime News : मंदिरात आलेल्या तरुणीला तीन पुजाऱ्यांनी भांग देऊन अत्याचार केला आणि नंतर…
Crime News : ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मनःशांती मिळवण्यासाठी मंदिरात आलेल्या एका तरुणीला मंदिरातील पूजाऱ्यांनी भांग दिला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.
यावर पुजारी थांबला नाही, तर त्या तरुणीची त्याने निर्घृण हत्याही (Murder) केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिासांनी एका पुजाऱ्याला अटक केली आहे.
काय आहे नेमकी घटना?
घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी डायघर जवळील शीळ फाटा गणेश घोळ या मंदिरात मनःशांतीसाठी आली होती. मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश इथं आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेश घोळ यांनी मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं. पीडित महिला ही बेलापूर इथं राहाणारी आहे. घरात कौटुंबिक वाद सुरु असल्याने ती 6 जुलैला ती शिळ फाटा रोडवरच्या गणेश घोळ मंदिरात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आली.
दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिलं. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहा मध्ये भांगेची गोळी मिसळून दिली. चहा प्यायला नंतर महिलेची शुद्ध हरपली. त्यानंतर रात्रभर ही महिला या मंदिरातच होती. रात्रीच्या वेळी मंदिरातील श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
महिलेची निर्घृण हत्या
महिला आरडाओरडा करत असल्याने आपलं बिंग फुटेल या भितीने पुजाऱ्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटलं, यातच त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महिलेचा मृतदेह त्यांनी मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भाविकाला डोंगरावर जंगलात पडलेला महिलेचा मृतदेह दिसला. त्याने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना गणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांना चौकशी केली असता त्यांनी या घटनेची कबुली दिली. पोलिसांनी संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या दोघांना अटक केली.
मात्र तिसरा आरोपी श्यामसुंदर शर्मा हा तिथून फरार झाला. पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला ट्रॉम्बे इथळ्या चिता कॅम्प परिसरातून अटक केली. श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीनही आरोपींना अटक करण्यात आलीय. ठाणे कल्याण डोंबिवली सह समस्त ठाणे परिसरातील एक प्रसिद्ध असणाऱ्या गणेश घोळ परिसरात ही अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.