Ladki Bahin Yojana: घरबसल्या भरता येईल लाडकी बहीण योजनेचा अर्ज, वाचा कसा?
महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत महिलांना प्रति महिना १५०० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
यासाठी अर्ज करताना महिलांना तलाठी कार्यालयात जावे लागत होते. परंतु यामुळे महिलांना तासनतास रांगेत उभे राहवे लागत आहे. त्यामुळेच आता तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुन या योजनेत आपला फॉर्म शकतात.
तुम्ही ‘नारीशक्ती दूत’ हे अॅप डाउनलोड करुन त्यावरुन फॉर्म भरु शकतात. ऑनलाइन पद्धतीने तुमचा वेळ वाचेल त्याचसोबत तुमचे काम पटकन होईल. नारीशक्ती अॅपवरुन अर्ज कसा करायचा याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोरवर जाऊल नारीशक्ती दूत अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे तिचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुमचे अॅपवर लॉग इन तयार होईल.
यानंतर नियम व अटी अशी माहिती येईल. त्यावर क्लिक करुन पुढे जायचे आहे.
ज्या मोबाईल नंबरने तुम्ही लॉग इन केले आहे.त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येईल. यानंतर व्हेरिफाय ओटीपी पर्यायावर क्लिक करा आणि ओटीपी टाका.
त्यानंतर तुमचे प्रोफाइल अपडेट करा असा मेसेज तुम्हाला येईल. तिथे तुम्ही तुमची माहिती भरु शकतात.
प्रोफाइल अपडेट करताना तुमचे नाव, ई-मेल आयडी, जिल्हा, तालुका ही माहिती भरायची आहे
प्रोफाइल तयार झाल्यावर नारीशक्ती दूत पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर क्लिक करा.
यानंतर महिलेचे नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्मतारीख, शहर, पीन कोड, मोबाईल नंबर, आधार नंबर याबाबत मुलभूत माहिती भरा. तसेच तुमची वैवाहिक माहिती आणि बँक खात्याचा नंबर लिहा.
यानंतर तुमचे आधार कार्ड, जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र या कागदपत्रांवर डाउनलोड करुन हे कागदपत्रे अपलोड करा. यानंतर पासबूकचा फोटो आणि अर्जदार महिलेचा फोटो अपलोड करा.
तुम्ही भरलेली माहिती एकदा तपासा आणि अर्ज दाखल करा. यानंतर तुम्हाला ओटीपी प्राप्त होईल. यानंतर ओटीपी टाकून अर्ज भरा.