Chhagan Bhujbal : मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मनोज जरांगेंची मागणी; छगन भुजबळ म्हणाले काय ?
Chhagan Bhujbal News : मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिमांच्या ओबीसी नोंदी सापडत आहेत. त्यांना देखील ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली होती. या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
जे ओबीसींच्या समकक्ष आहेत त्यांना आरक्षण मिळत आहे. त्याला आम्ही कधीच विरोध केला नाही. तुझा अभ्यास कमी आहे. 25 वर्षापूर्वीच कुरेशी, बागवान या घटकांना आरक्षण दिले आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, लक्ष्मण हाके आम्ही सगळे ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी एकत्रित आहोत, असे देखील छगन भुजबळ म्हणाले.
मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण OBC Reservation देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीची भुजबळ यांनी खिल्ली उठवली. ‘तुझा अभ्यास कमी आहे. 25 वर्षांपूर्वी कुरेशी, बागवान या घटकांना आरक्षण दिले आहे. दिलीपकुमार यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. त्याच वेळी इकडाचा व्यवसाय तिकडा व्यवसाय साम्य असणारांना आरक्षण दिलं गेलं.’, असे भुजबळ म्हणाले.
‘उगाच काही माहिती नसताना बोलायचं म्हणून बोलायचं. मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजाला खुश करण्यासाठी तर कधी वंजारी समाजाला खुश करण्यासाठी बोलायचं. तुम्ही अभ्यास करा त्यासाठी’ असा टोला देखील जरांगेंना छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी लगावला.