crime news : विवाहितेवर चुलत भावासह दोन मित्रांनी केला अत्याचार
crime news : जळगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अठ्ठावीस वर्षीय विवाहितेवर तिच्या चुलत भावासह त्याच्या दोन मित्रांनी दोन वर्षांपासून अत्याचार केला.
याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेला तीन मुले आहेत. दोन ते अडीच वर्षांपूर्वी लग्न असल्याने नातेवाईक एकत्र आले होते. त्यावेळी नात्यातील एकाशी पीडितेची ओळख झाली. त्याने पीडिता अंघोळ करीत असताना, व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला. त्या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून तिच्याशी शारिरीक संबध प्रस्थापित केले. त्याच्या दोन मित्रांनीही पीडितेवर अत्याचार करून त्रास देणे सुरू केले.
तसेच इन्स्टाग्रामवर पीडितेचे अकाउंट असल्याने त्याद्वारे संशयित सचिन भाट पीडितेशी संपर्कात होता. त्याच माध्यमातून त्याने विवाहितेला ब्लॅकमेल केले.
दरम्यान त्रास सहन न झाल्याने पीडितेने पती व कुटंबीयाच्या आधाराने हिंमत करून रविवारी (ता. २३) दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात पीडितेचा चुलत भाऊ सचिन किशोर भाट (रा. नंदुरबार), बंटी नेतलेकर (दोंडायचा), नीलेश तमायचेकर (नंदुरबार) यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.