महिला आधी मोहित करतात मग कुबतर बनवतात, भारतातील या गावात पुरुषांनी सांभाळून
जगभरात इतक्या परंपरा आणि चालिरिती प्रचलीत आहेत की त्यांच्याबद्दल अनेकांना माहितच नाही. ज्यामुळे एकादी वेगळी परंपरा लोकांसमोर येते, तेव्हा लोक आश्चर्य व्यक्त करतात आणि हे कसं शक्य आहे?
असा प्रश्न उपस्थीत होतो. अशाच एका गावातील परंपरेबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
हे गाव आसाममधील गुवाहाटीमधील आहे. ज्याचं नाव मायोंग आहे. जादुई शक्ती प्राप्त करण्यासाठी जगभरातून लोक या गावात येतात. हे गाव महाभारतातील पराक्रमी योद्धा घटोत्कच यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. घटोत्कच हा मायोंगचा राजा मानला जातो. जादुई शक्ती असलेले हे गाव गुवाहाटीपासून ५५ किमी अंतरावर आहे.
असे मानले जाते की पांडवपुत्र भीम आणि त्याची राक्षस पत्नी हिडिंबा यांचा मुलगा घटोत्कच यांनी मायोंग गावात जादुई शक्ती प्राप्त केल्यानंतरच महाभारत युद्धात भाग घेतला होता. असे मानले जाते की शतकानुशतके तांत्रिक जादुई शक्ती मिळविण्यासाठी या गावातील मंदिरात प्रेमीयुगुलांचा मानवी यज्ञ करत असत.
गावातील या मंदिरात कोणत्याही देवतेची मूर्ती नसून केवळ दगड आणि काही हत्यारे पडून आहेत. मायोंग गावात एक संग्रहालय देखील आहे. जिथे मायोंगच्या तंत्रविद्या आणि तांत्रिकांचा इतिहास लिहिला आहे. या संग्रहालयात हजारो वर्षे जुन्या व्यवस्थांची माहिती कॅथी लिपीमध्ये लिहिली आहे. मात्र, या गावात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या गावातील महिलाही तंत्रविद्या करतात, एक काळ असा होता जेव्हा या गावात फक्त महिलांचे राज्य होते, ज्याला ‘त्रिय राज’ म्हणतात.
असा दावा केला जातो की मायॉन्गच्या स्त्रिया पुरुषांना मोहित करतात आणि त्यांचे पक्षी, माकडे, कोल्हे, पोपट आणि अगदी कबुतरांसारख्या पक्ष्यांमध्ये रूपांतरित करतात. या त्या व्यक्तीला दिवसभर या अवस्थेत ठेवायच्या आणि रात्री ती त्याला पुन्हा माणूस बनवायच्या. या अंधश्रद्धेचा प्रभाव इतका मोठा होता की आजही आसपासच्या भागातील पुरुष या गावात यायला घाबरतात. आजही मायोंग हे तंत्रविद्येचे गाव मानले जाते.
वरील माहिती ही सामान्य माहितीवर अवलंबून आहे. लोकशाही न्यूज 24मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत माहित पोहोचवण्याचा आहे.