नीता अंबानी पितात जगातलं सर्वात महाग पाणी, एक घोटाची किंमत वाचून थक्क व्हाल !
सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच चर्चेत असतात. निता अंबानी या जगात सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत.
निता अंबानी अनेक महागड्या गोष्टींचा वापर त्यांच्या नियमित आयुष्यात करतात. इतकच काय तर नीता अंबानी ज्या बॉटलमधून पाणी पितात ती बॉटल जगातली सर्वात महागडी बॉटल आहे. या बॉटलची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
नीता अंबानी जगातलं सर्वात महागडं पाणी पितात. BollywoodShaadis नुसार नीता अंबानी या स्वत:ला हेल्दी ठेवण्यासाठी ‘Acqua di Cristallo Tributo a Modigliani’ च्या बॉटलने पाणी पितात. ही जगातल्या सर्वात महागड्या बॉटलपैकी एक आहे. ही बॉटल सोन्यापासून बनवली जाते. या बॉटलचं डिझाइन Fernando Altamirano ने तयार केलं आहे. या बॉटलमध्ये असलेलं पाणी हे फ्रान्स किंवा फिजीमधील असतं. असं म्हणतात की, या पाण्यात 5 ग्रॅम सोन्याचा भस्मही मिश्रित केला जातो. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे या बॉटलची किंमत सर्वाधिक आहे.
नीता अंबानींच्या या खास पाण्याच्या बाटलीबद्दल बोलायचं झाले तर लिलावात ती 60 हजार अमेरिकन डॉलर्सला विकली गेली. भारतीय चलनानुसार त्याची किंमत 49 लाख रुपये आहे. एवढचं नाही तर निता यांना अनेक नवाबी छंद आहेत. त्या आपल्या दिवसाची सुरुवात जपानमधील सर्वात जुन्या क्रॉकरी ब्रँड नोरिटेकच्या कपमध्ये चहा पिऊन करतात. या क्रॉकरीचे वैशिष्ट्य म्हणजे याला सोन्याची बॉर्डर असून त्याच्या 50 पीसच्या सेटची किंमत दीड कोटी रुपये आहे. म्हणजेच फक्त एका कपची किंमत 3 लाख रुपये आहे.