या देशात 95 वर्षापासून जन्मलं नाही एकही बाळ; कारण आहे इथला नियम, जाणून व्हाल शॉक
तुम्ही जगातील विविध देशांबद्दल जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला असे अनेक तथ्य सापडतील जे ऐकून खूप आश्चर्य वाटेल. असंच एक तथ्य हे आहे की, गेल्या 95 वर्षांत एका देशात एकही मूल जन्माला आलं नाही.
इतकंच नाही तर इथं कुणालाही कायमस्वरूपी नागरिकत्व मिळत नाही, तिथे राहणाऱ्या सगळ्यांनाच तात्पुरतं नागरिकत्व मिळतं.
या देशात एकही मूल जन्माला आलं नाही. 11 फेब्रुवारी 1929 रोजी या देशाची निर्मिती झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 95 वर्षांनंतरही इथे एकही मूल जन्माला आलेलं नाही. त्यामागील कारण अधिकच आश्चर्यकारक आहे. या देशाचं नाव व्हॅटिकन सिटी आहे. हा जगातील सर्वात लहान देश म्हणून ओळखला जातो. असं मानलं जातं, की जगभरातील सर्व कॅथोलिक चर्च आणि कॅथोलिक ख्रिश्चनांची मुळे येथूनच आहेत. कॅथोलिक चर्च आणि जगभरातील त्यांचे धर्मगुरू तसंच प्रमुख धार्मिक नेते येथूनच नियंत्रित केले जातात.
व्हॅटिकन सिटीमध्ये रुग्णालय न उघडण्याचा निर्णय त्याच्या लहान आकारामुळे आणि आजूबाजूच्या परिसरात असलेल्या दर्जेदार वैद्यकीय सुविधांमुळे घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं. व्हॅटिकन सिटीचं क्षेत्रफळ केवळ 118 एकर आहे. सर्व रुग्णांना उपचारासाठी रोममधील दवाखाने आणि रुग्णालयात जावं लागतं. इथे प्रसूती कक्ष नसल्याने इथे कोणीही मुलाला जन्म देऊ शकत नाही.
इथे नैसर्गिक बाळंतपण होत नाही किंवा होऊ दिलं जात नाही. जेव्हा एखादी महिला इथे गर्भवती होते आणि प्रसूतीची तारीख जवळ येते, तेव्हा येथील नियमानुसार, तिला मूल होईपर्यंत येथून दुसरीकडे जावं लागतं. हा नियम अतिशय कडक आहे. व्हॅटिकन सिटीमध्ये 95 वर्षांत एकही मूल जन्माला आलं नाही. हा देश अस्तित्वात आल्यापासून येथे एकही रुग्णालय बांधलं गेलं नाही. रुग्णालय बांधण्यासाठी अनेकवेळा विनंती करण्यात आली, मात्र ती फेटाळण्यात आली.
इथे कोणी गंभीर आजारी असेल किंवा एखादी स्त्री गरोदर असेल तर तिला रोमच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं किंवा तिला तिच्या देशात पाठवण्याची व्यवस्था केली जाते. याला कायदेशीर कारणेही आहेत. व्हॅटिकन सिटीमध्ये कोणालाही कायमस्वरूपी नागरिकत्व मिळत नाही. येथे राहणारे सर्व लोक केवळ त्यांच्या ठराविक कार्यकाळासाठीच येथे राहतात, तोपर्यंत त्यांना तात्पुरते नागरिकत्व मिळते. त्यामुळे भविष्यात कायमस्वरूपी नागरिकत्व मिळू शकणारी अशी मुलं इथे जन्माला येत नाहीत.
व्हॅटिकनचे रहिवासी भरपूर दारू पितात असं म्हटलं जातं. व्हॅटिकनमधील रहिवासी दरवर्षी आश्चर्यकारकपणे 74 लिटर वाइन पितात. अति मद्यपानाची अनेक कारणं आहेत. शहरातील एकमेव सुपरमार्केटमध्ये दारू जवळपास करमुक्त उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत त्याचा खपही जास्त असतो. व्हॅटिकनमध्ये रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्माशी संबंधित ज्येष्ठ पादरींसह केवळ 800-900 लोक राहतात. व्हॅटिकन सिटीमध्ये जगातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन देखील आहे. स्टेशनमध्ये दोन 300 मीटर लांबीचे ट्रॅक आहेत आणि पोप पायस XI च्या कारकिर्दीत सिट्टा व्हॅटिकानो नावाचे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन बांधले गेले. त्याचा वापर फक्त सामान वाहून नेण्यासाठी होतो.