व्हिडिओ न्युज

Video मोबाईलचा नाद बेक्कार ! आई-वडिलांनी लेकीसाठी पाळला श्वान; पण त्यालाही लागले रील्स पाहण्याचे वेड


बदलत्या काळानुसार लहान मुलांच्या मागण्या, आवडी-निवडीदेखील बदलत असल्याचं आपण पाहतो. पूर्वीची लहान मुलं उन्हाळ्याची सुट्टी लागली की, पकडापकडी, लंगडी, लपाछपी, दोरी उड्या असे मैदानी खेळ दिवसभर खेळायची.

त्यातून त्यांच्या एकंदर आरोग्याच्या विकासासाठी आवश्यक अशा योग्य त्या शारीरिक हालचालीही व्हायच्या. परंतु, अलीकडची मुलं असे मैदानी खेळ खेळण्याऐवजी एका जागी बसून मोबाईलमधील गेम्स खेळणं पसंत करतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या मानसिकतेवरही गंभीर परिणाम होत असल्याचं दिसून येतं. या गोष्टीमुळे सध्या अनेक पालक चिंतेत असतात. आपल्या मुलांना सोशल मीडिया, गेम्स यांच्या व्यसनातून कसं सोडविता येईल याकडे अनेकांचं लक्ष असतं. याच संदर्भातील एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

 

 

नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीच्या आई-वडिलांनी तिच्यासोबत खेळण्यासाठी तिच्या आवडीचा श्वान पाळला. त्यांच्या मते, श्वानासोबत खेळण्यात दंग झाल्यावर ही मुलगी मोबाईलचा नाद सोडून देईल; पण इथे काहीतरी उलटंच झालं. ते पाहून युजर्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा करताना दिसत आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर)वरील @?o̴g̴ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी जमिनीवर लोळत मोबाईलमध्ये काहीतरी बघत आहे. त्याशिवाय यावेळी तिच्यासोबत खेळायला आणलेला श्वानदेखील आरामात बसून मोबाईलमध्ये काहीतरी बघण्यात दंग आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय, ‘त्यांना एक श्वान मिळाला. त्यांना वाटलं की, त्याच्यामुळे ती मोबाईलचे व्यसन सोडेल; पण आता ते दोघेही व्यसनी झाले आहेत.’

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओला आतापर्यंत २.६ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, एक मिलियनहून अधिक लाइक्सही मिळाले आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. त्यावर एकानं लिहिलंय, ‘एखाद्या पाळीव प्राण्याची तिचे मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठी मदत घेणे ही एक चांगली कल्पना आहे. परंतु, हे व्यसन दूर करण्यासाठी याहून चांगले तर्क लढवायला हवेत.’ तर, आणखी एकानं लिहिलंय, ‘माझी मुलंदेखील अशीच आहेत.’ तर, आणखी एका युजरनं लिहिलंय, ‘हे बाहेरील जगाचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्याऐवजी इंटरनेटवर रमले आहेत, वाईट सत्य.’


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button