व्हिडिओ न्युज

Video गळ्यात पुष्पहार घालताना नवरी दाखवू लागली नखरे, मग नवरदेवाची नवरीच्या गळ्यात पुष्पमाला घालण्यासाठी भन्नाट शक्कल


लग्नातील संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात व ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक व्हिडिओ नेटीझन्सना पसंत पडत असतात. यामुळे लग्नाचे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात.

कधी कधी या व्हिडिओमधून असे काही प्रकार समोर येतात की, त्यावर विश्वास ठेवणे मुश्किल होतो. तर काही व्हिडिओ पाहून लोकांची हसून हसून पुरेवाट होते.

सद्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की, जयमाला कार्यक्रमासाठी नवरा-नवरी स्टेजवर आहेत. लग्नाचे विधी सुरू आहेत.

हा व्हिडिओ नवरदेवाच्या कृतीमुळे लोकांचे लक्ष्य वेधून घेत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, वर-वधू स्टेजवर उभे आहेत. पुष्पमाला घालण्याचे विधी केले जात आहेत. वधूने वराच्या गळ्यात पुष्पमाला घातली आहे. नवरदेवाने आरामात हार आपल्या गळ्यात घालून घेतला. मात्र जेव्हा नवरीची बारी आली तेव्हाती नखरे दाखवू लागली. नवरदेव पुष्ममाला गळ्यात घालायला पुढे जाताच नवरी मागे सकरते. त्याचवेळी मुलीचे नातेवाईक नवरीला उचलून खांद्यावर घेतात. मात्र नवरीच्या गळ्यात पुष्पमाला घालण्यासाठी भन्नाट शक्कल लढवतो. नवरा खुर्चीवर चढून तेथून नवरीच्या अंगावर झेप घेतो. यामुळे नवरी व तिला उचलून घेतलेले नातेवाईक स्टेजवरच कोसळतात. मात्र यात नवरदेवाने पुष्पमाला नवरीच्या गळ्यात घातलेली दिसते.

 

हा व्हिडिओ@sarita_sarawag या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.२२ एप्रिल रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ४८९.२ हजार लोकांनी पाहिला आहे. तसेच ३.२ हजार लोकांनी लाईक केले आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button