जगातील सर्वात श्रीमंत राजकीय नेता कोण ? 700 कार, 58 विमाने,संपत्ती किती?
बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. याबाबत सर्वांना माहितच असेल. पण जगातील सर्वात श्रीमंत राजकारणी कोण? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का?
आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत राजकीय नेत्यांबद्दलची (Political Leader) माहिती सांगणार आहोत. एका अहवालानुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे जगातील सर्वात श्रीमंत राजकीय नेता आहेत. जाणून घेऊयात त्यांच्या संपत्तीबद्दल सविस्तर माहिती.
व्लादिमीर पुतिन यांची संपत्ती किती?
अनेकदा आपण पाहतो की, राजकारणी आपली संपत्ती कधीच उघड करत नाहीत. पण एका राजकीय नेत्याची संपत्ती पाहून तुम्हाला धक्का बसेल. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जगातील सर्वात श्रीमंत नेता आहेत. अहवालात दिलेल्या माहितीनुसार व्लादिमीर पुतिन यांच्याकडे 200 अब्ज डॉलर्सची म्हणजे 16,71,877 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पुतीन यांना वर्षाला 1 कोटींहून अधिक वार्षिक पगार आहे. त्यांच्याकडे शेकडो गाड्या, विमानं, अलिशान घरं आहेत. अलिशान जीवनशैलीसाठी पुतीन यांची वेगळी ओळख आहे.
700 कार, 58 विमाने
पुतीन यांच्याकडे मोठ मोठी आलिशान घरे आहेत. यातीलच एक म्हणजे ब्लॅक सी बंगला, ज्याला कंट्री कॉटेज असं देखील म्हणतात. याव्यतिरीक्त पुतीन यांच्याकडे 19 आलिशान घरे आहेत. तसे 700 कार, 58 विमाने तसेच हेलिकॉप्टर देखील त्यांच्याकडे आहेत. तसेच शेहेराजादे नावाची बोट देखील त्यांच्याकडे आहे. तसेच त्यांना ब्रॅन्डेड घड्याळांची देखील आवड आहे.