मनोज जरंगे पाटील यांच्या परळी येथील संवाद बैठकीस तात्काळ परवानगी देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले
बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मनोज जरंगे पाटील यांच्या परळी येथील संवाद बैठकीस तात्काळ परवानगी देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
मराठा समाजाणे हायकोर्टाच्या या निर्णाचं ढोल वाजवून स्वागत केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आज बीडच्या परळी येथे होणाऱ्या संवाद बैठकीला परवानगी नाकारण्यात आली होती. यावर न्यायालयाने निर्णय दिला आहे.
आचारसंहितेचं कारण दाखवून प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद बैठकीस तात्काळ परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. आदेश मिळतात बीडच्या परळीत मराठा आंदोलकांनी ढोल ताशा वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं आहे. परळी येथे होणाऱ्या संवाद बैठकीस प्रशासनानं परवानगी नाकारली होती. त्यामुळं मराठा आंदोलकांनी थेट कोर्टामध्ये धाव घेत परवानगीची मागणी केली होती. यावर आज कोर्टात सुनावणी झाली आणि कोर्टाने जरांगेंचे बैठकीला परवानगी दिली आहे.
परवानगी देत असताना कोर्टाने जरांगे यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना गावबंदीचं आवाहन न करण्याचे तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलंही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले आहेत. बीड पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं कारण देत परवानगी नाकारली होती. त्यामुळे आयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. आता न्यायालयाने अटी शर्तींच्या अधीन राहून बैठकीला परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता मराठा समाजाने परळीत बैठकीचे आयोजन केलं आहे. या बैठकीला मनोज जरांगेही हजर राहणार आहे.