भारतातील मेट्रोमधील व्हायरल व्हिडिओ प्रकरण नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. कधी महिलांची भांडणे तर कधी तरुण- तरुणींच्या डान्स, अन् भांडणांमुळे मेट्रो चर्चेत येत असतात.
ज्याचे अनेक व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत असतात. मात्र न्यूयॉर्कमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून प्रवाशांमध्ये झालेल्या भांडणांतर चक्क गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
JUST IN: New Yorkers take cover and beg for the NYPD to come and save them after man is shot in the head.
The incident happened inside the Hoyt-Schermerhorn subway station in Brooklyn.
According to ABC 7, the shooter, 36, pulled out a gun after provoking the fight with… pic.twitter.com/9mCHT2pTdw
— Collin Rugg (@CollinRugg) March 14, 2024
मेट्रोमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. केवळ भारतीय रेल्वे, मेट्रोमध्येच असे प्रकार घडत नाहीत तर परदेशातील मेट्रोंंमध्येही अशा घटना घडतात. सध्या न्यूयॉर्क (New York) शहरातील सबवे ट्रेनमधील असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भांडणानंतर चक्क गोळीबार झाल्याचे दिसत आहे.
न्यू यॉर्क शहरातील ब्रुकलिन येथील हॉयट-शर्मरहॉर्न स्टेशनवर पोहोचलेल्या सबवे ट्रेनमध्ये दोन प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर मारामारीमध्ये झाले. धक्कादायक बाब म्हणजे यादरम्यान एका व्यक्तीने दुसऱ्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रवाशांचा आरडा ओरडा अन् किंकाळ्या पाहायला मिळत आहेत.
या व्हिडीओमध्ये (Viral Video) एक महिला या कोचमध्ये लहान मुलं आहेत, तुम्ही असे करु नका म्हणत विनंती करताना दिसत आहे. मात्र, हे भांडण अजूनही संपत नाही आणि त्यानंतर एकामागून एक अशा 4 गोळ्या झाडल्या गेल्याचे आवाज ऐकू येत आहेत.
या घटनेमुळे कोचमध्ये उपस्थित असलेले सर्वजण घाबरले आणि आरडाओरडा करू लागले. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.