पपई खाणं काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते,फायद्याऐवजी होईल नुकसान
पपई हे असं फळ आहे, जे वर्षभर बाजारात सहज मिळतं. पपईमध्ये फायबर, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन ए, बी, सी आदींचा समावेश असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आरोग्य गुणधर्मांनी समृद्ध असलेली पपई खाणं काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते.
पपई बहुतेक लोकांना खायला आवडते. वजन कमी करण्यासाठी अनेकजण तिचं सेवन करतात. या फळामध्ये असलेले गुणधर्म शरीराला अनेक फायदे (papaya benefits in marathi) देतात. पण तुम्हाला माहीत आहे का, पपई खाण्याचे फायदे तोटे दोन्ही आहेत. चला तर हे दुष्परिणाम कोणते आहेत, कुणी पपईचं सेवन करू नये, ते जाणून घेऊ.
पपई खाण्याचे तोटे (Papaya Side Effects In Marathi)
– पचनसंस्थेची समस्या उद्भवते
पपई खाल्ल्याने तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टीनल सिस्टमला नुकसान होऊ शकते. तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असतील, तर तुम्ही जास्त प्रमाणात पपई खाणं टाळावं. जास्त प्रमाणात पपईचं सेवन केल्यास पचनसंस्थेच्या समस्या वाढू शकतात.
– पपई खाण्याची अॅलर्जी
पपईमध्ये असलेले एंझाइम पापेन एक शक्तिशाली अॅलर्जीक आहे. त्यामुळे पपईच्या अतिसेवनानं श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते. काहींना पपई खाण्याची अॅलर्जी असू शकते. अशा लोकांनी ती खाणं टाळलं पाहिजे.
– गरोदरपणात पपई खाणं टाळा
गरोदरपणात कच्ची किंवा अर्धी पिकलेली पपई खाणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे गरोदरपणात पपई खाणं टाळणं गरजेचं असतं. अन्यथा अशा वेळी तिचं सेवन करणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
– बद्धकोष्ठतेची समस्या
पपईमध्ये फायबरचे प्रमाण हे जास्त असते, व जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पपईचं अतिसेवन टाळणे गरजेचं आहे. तिच्या अतिसेवनानं शरीरावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात.
– डिहायड्रेशनची समस्या
पपईचे जास्त सेवन केल्यास अतिसार होऊ शकतो, तसेच डिहायड्रेशनची समस्याही उद्भवू शकते. दरम्यान, पपई हा आहारातील फायबरचा निरोगी स्रोत आहे. पपईमध्ये कॅलरी आणि फॅट कमी प्रमाणात असते, जे वजन कमी करण्यास मदत करू शकतात. पण हे फळ खाण्याचे जसे फायदे आहेत, तसे काही तोटे देखील आहेत. त्यामुळे पपई केव्हा खावी, किती प्रमाणात खावी, कोणी खावी, याची माहिती असणे गरजेचं आहे. 12 महिने बाजारामध्ये सहज उपलब्ध असणारे पपई हे फळ खाण्याची योग्य पद्धत आत्मसात करणे, हे आरोग्यासाठी केव्हाही फायद्याचं ठरू शकते. अन्यथा तिचे सेवन तुमच्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.