ताज्या बातम्याराजकीय

नवनीत राणा बांधणार का घड्याळ ?


अमरावती

खासदार नवनीत राणा येणारी लोकसभा निवडणुक एनडीए समर्थीत अपक्ष लढतात की भाजपाची उमेदवारी घेऊन रिंगणात उतरतात, याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असतानाच आता नवी चर्चा समोर आली आहे.

त्या राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन निवडणुक लढवू शकतात, अशी ती चर्चा असून सदर पर्यायावर राणा दाम्पत्य गंभीरतेने विचार करीत असल्याची सुत्रांची माहिती आहे.

राणा दाम्पत्याचा राजकीय प्रवास जेव्हापासून सुरू झाला, तेव्हापासून त्यांची जवळीक काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहीली आहे. त्यांनी 2009, 2014, 2019 अशा तिन्ही विधानसभा निवडणुकीत रवि राणा यांना पाठींबा दिला आहे. 2014 मध्ये तर राष्ट्रवादीने नवनीत यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. घड्याळ चिन्हावर लढलेल्या या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या. शिवसेनेचे आनंद अडसूळ विजयी झाले होते. 2019 मध्ये नवनीत अपक्ष मैदानात उतरल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने त्यांना पाठींबा दिला होता. या निवडणुकीत त्या आनंद अडसूळ यांना पराभूत करून विजयी झाल्या होत्या. Navneet Rana काही दिवसातच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची म्हणजेच युपीएची साथ सोडून भाजपाच्या नेतृत्वातल्या एनडीए सरकाराला समर्थन दिले होते. तेव्हापासून त्या व त्यांचे पती एनडीएच्या सोबत आहे. हिंदुत्वाचा आवाजही त्यांनी दरम्यानच्या काळात बुलंद केला.

हनुमान चालिसा प्रकरणावरून त्यांना तुरूंगातही जावे लागले. नव्या लोकसभा निवडणुकीचे वारे आता जोरात वाहत असल्याने त्या भाजपाची उमेदवारी घेऊन लढतील किंवा एनडीए समर्थीत अपक्ष लढतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, भाजपाच्या बहुतांश स्थानिक पदाधिकार्‍यांचा नवनीत यांना भाजपात घेण्याला आणि उमेदवारी देण्याला विरोध आहे. समर्थन देण्याबाबत पदाधिकारी मवाळ आहेत. स्थानिक शिवसेनेचाही विरोध आहे. आता नवनीत राणा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढण्याबाबत गंभीर असल्याची नवी चर्चा आहे. पण, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाचा त्यांच्यासोबत जुनाच अबोला आहे. गेल्या साडेचार वर्षातल्या राणा दाम्पत्याच्या नव्या राजकीय भूमिकेमुळे समिकरणे बदलली असून स्थानिक राजकीय घडामोडीने राणा दाम्पत्य गोंधळले आहे. विजयााठी कोणता पर्याय निवडावा यावर त्यांच्याकडून गहन विचार होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button