ताज्या बातम्याव्हिडिओ न्युज

Video’शिकार करो या शिकार बनो’ चिमुकल्या कुत्र्याची वाघाशी झुंज


जंगलातील सर्वात खतरनाक शिकारी म्हणून वाघ ओळखला जातो. वाघाशी पंगा म्हणजे थेट मृत्यूच. कारण एकदा का वाघानं पकडलं की मग तो जंगलाचा राजा असला तरी त्याला तो सोडणार नाही.

त्यामुळे मोठमोठे प्राणी देखील वाघापासून चरा चार पावलं दूरच राहतात. कारण त्याचा वेग आणि हल्ला करण्याची क्षमता जबरदस्त असते. पण या सर्व गोष्टीना दूर सारून एका चक्क एका कुत्र्यानं वाघाशी दोन हात केले. वाघ शांतपणे झोपला होता. अन् कुत्रा जवळ गेला अन् भोंकू लागला. त्यानंतर जे काय घडलं ते तुम्हीच पाहा, एका कुत्र्याचं हे डेअरिंग पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटतं. एका कुत्रा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाघांवर कसा काय झेपावू शकतो, असा प्रश्न अऩेकांना पडतो. वाघानं केवळ ८ सेकंदात कुत्र्याचा खेळ खल्लास केला.

वाघ विरुद्ध कुत्रे वाघ किंवा सिंह यासारख्या प्राण्यांशी झुंज देणाऱ्या आणि त्यात यशस्वी होणाऱ्या प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आपण पाहतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या कडेला वाघ झोपलेला आहे. यावेळी तिथून एक छोटासा कुत्रा जात आहे, तेवढ्यात वाघाला अंदाज येतो आणि वाघ कुत्र्यावर झडप घालतो. वाघाने पटकन या कुत्र्याच्या मानेला पकडलं आणि तो तिथून निघून गेला. वाघाने काही सेकंदातच कुत्र्याचा जीव घेतला. श्वानाने वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी बरीच धडपड केली. मात्र, त्याला यात यश मिळालं नाही. वाघाने कुठलाही त्रास दिला नसताना उगाच जाऊन त्यांच्याशी पंगा घेण्याची प्रवृत्ती प्राण्यांमध्ये आढळत नाही.

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक वारंवार हा व्हिडीओ पाहात आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या.वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. यामुळे वाघांच्या संवर्धनाबाबत आपल्या देशातील लोक अधिक जागरुक असतात. जंगलांचे प्रमाण दिवसेनदिवस कमी होत असल्याने वनप्राण्यांची संख्या कमी होत आहे. हरीण, सांबर असे प्राणी वाघाची शिकार असतात. हे प्राणी नाहीसे झाल्याने भक्ष्य मिळवण्यासाठी वाघांसारखे जंगली प्राणी नाईलाजाने मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button