जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासावर उत्तुंग यश मिळविता येते – प्रा. त्रिंबकराव काकडे
जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासावर उत्तुंग यश मिळविता येते…प्रा. त्रिंबकराव काकडे
रयतच्या न्यू.इंग्लिश स्कुल,पांगारे विद्यालयात एस.एस.सी शुभचिंतन समारंभ संपन्न झाला.
समारंभाच्या अध्यक्षपदी स्टार्क एज्युकेशन कोल्हापूरचे मुख्य प्रशासक मा.त्रिंबकराव काकडे तर प्रमुख अतिथी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा.माहुरकर एस.के.होते.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी तथा वहिनी सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमापूजनानी झाली.
इयत्ता ८ वी तील विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.तावरे एन.ई यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये विद्यालयाचा इतिहास व शुभेच्छा दिल्या. इयत्ता ५ वी ते ९ वी तील विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात १० वी तील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. इयत्ता १० वी वर्गशिक्षक श्री.मेमाणे एस.जी यांनी विद्यार्थ्यांना आपले भविष्य उज्जवल करण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले.
मा.माहुरकर एस.के यांनी दहावी नंतर आपले करिअर कसे करावे याबद्दल मौलिक माहिती देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रा.त्रिंबकराव काकडे जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास याच्या जोरावर मनुष्यला समाजात मान, प्रतिष्ठा प्राप्त होते,विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी असा मोलाचा सल्ला आपल्या मनोगतातुन दिला.आभार श्री. भोसले जी.एन यांनी तर निवेदन कु.प्रिया माने (इयत्ता ९ वी)हिने केले.