Video रास्ता रोको करताना शांततेत आंदोलन करा ही विनंती जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केली अन आंदोलकांन पेटवली स्वतःचीच गाडी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे. पण आता आंदोलनही पुकारण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यभरात रास्ता रोको केला जातो आहे. हे आंदोलन शांततेत करावं असे आदेश मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.
पण मराठा आंदोलकाने त्यांचा आदेश झुगारत गाडी पेटवली आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी इथं रास्ता रोको करताना एका आंदोलकाने स्वतःची दुचाकी जाळली आहे. शिवहरी लोंढे असं या व्यक्तीचं नाव. त्याने आक्रमक होत स्वतःचीच गाडी पेटवली आहे. आंदोलनादरम्यान त्याने मुख्य रस्त्यावर आपली दुचाकी आणली आणि पेटवून दिली. या पेटलेल्या गाडीचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
व्हिडिओ पहा
👇👇👇👇
नांदेडमध्ये मराठा आंदोलकाने रास्ता रोकोवेळी जाळली बाईक pic.twitter.com/EExMqPGo89
— News18Lokmat (@News18lokmat) February 24, 2024
रास्ता रोको करताना शांततेत आंदोलन करा ही विनंती जरांगे पाटील यांनी आंदोलकांना केली. 11 ते 1 याच वेळेत रास्ता रोको करण्यास सांगितलं. त्यानंतर धरणं आंदोलन केलं जाणार आहे. परीक्षा लक्षात घेता कोणत्या विद्यार्थ्याला पेपरला जाण्यात अडचण येऊ नये याचा विचार करून आंदोलनात बदल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
सगे सोयरेची अमंलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवायचं नाही असं जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना सांगितलं. उद्या दुपारी अंतरवालीत समाजाची बैठक आहे. निर्णायक बैठक उद्या घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
जालन्यात मराठा आंदोलन 5 मिनिटात पाडलं बंद
जालन्यातील समृद्धी महामार्गावरील मराठा समाजाचं आंदोलन पोलिसांनी पाच मिनिटांतच हाणून पाडलंय.. बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण शिवारातील समृद्धी महामार्गावर मराठा समाजानं आंदोलन केलं. सकाळी 11 वाजता हे आंदोलन सुरु करण्यात आलं.. मात्र पोलिसांनी याठिकाणी येत अवघ्या पाच मिनिटातच हे आंदोलन हाणून पाडलंय. त्यामुळं आंदोलक मराठा समाज नाराज झाला.