ताज्या बातम्यादेश-विदेश

पाकिस्तानी राष्ट्रपतींकडून राहत्या घरात रोज एका काळ्या बकरीचा बळी; कारण काय?


पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीनंतरचा सत्तास्थापनेचा पेच मंगळवारी रात्री उशिरा सुटला. नव्या समीकरणांनुसार नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन आणि बिलावल भुत्तो झरदारींच्या पीपीपी पक्षाच्या सरकार पाकिस्तानचा कारभार संभाळणार आहे.

या दोन्ही पक्षांमधील वाटाघाटी यशस्वीपणे पार पडल्या असून शाहबाज शरीफ हे पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत. तर पीपीपीचे सहअध्यक्ष आसिफ अली झरदारी हे राष्ट्रपती होणार आहेत. सध्या शाहबाज शरीफ आणि आसिफ अली झरदारींची चर्चा असतानाच त्यांच्याबद्दलचे जुने नवे किस्से चर्चेत आहेत. यामध्ये आसिफ अली झरदारींच्या बकरा बळीचीही चांगलीच चर्चा आहे.

इस्लामाबादमधील घरात दिला जायचा बळी

भारतामधील फार कमी लोकांना याची कल्पना असेल की पाकिस्तानच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणारे आसिफ अली झरदारी हे रोज एका काळ्या बकरीचा बळी द्यायचे. 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 2008 मध्ये झरदारी पहिल्यांदा पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले होते. त्यावेळी रोज त्यांच्या घरी एक काळी बकरी आणून तिचा बळी दिला जायचा. काळी जादू आणि वाईट नजर लागू नये म्हणून झरदारी असं करायचे. ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने 2010 मध्ये यासंदर्भातील वृत्तांकन केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. जरदारी हे आपल्या इस्लामाबादमधील राहत्या घरामध्ये रोज एका काळ्या बकरीचा बळी द्यायचे.

मी स्वत: हे माझ्या डोळ्यांनी पाहिलंय

तत्कालीन प्रवक्ते फरहतुल्ला बाबर यांनी रोज एका काळ्या बकरीचा झरदारींच्या घरात बळी दिला जायचा या वृत्ताला दुजोरा दिला होता. राष्ट्रपती ‘सादिका’ करायचे, असं बाबर यांनी सांगितलं होतं. कोणत्याही प्राण्याचा बळी देऊन त्याचं मांस गरिबांमध्ये वाटण्याच्या प्रथेला ‘सादिका’ म्हणतात. मी स्वत: हे सारं माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, असं बाबर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं. मी दररोज हे पाहायचो नाही पण जवळपास नेहमीच हे असं व्हायचं. अल्लाहला खुश करण्यासाठी झरदारी हे करायचे. हे असं केल्याने वाईट गोष्टी घडणार नाही यावर झरदारींचा विश्वास होता. झरदारी यांच्या पत्नी बेनझीर भुट्टोंनी पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर ‘सादिका’ प्रथेची सुरुवात केली होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच एका आत्मघाती हल्ल्यात बेनझीर भुट्टोंची हत्या झाली होती.

झरदारीमुळे पक्षाला फटका

बेनझीर भुट्टो सत्ते आल्यानंतर झरदारी हे पक्षासाठी आणि सरकारसाठी एक बोज झाले होते. त्यांच्यामुळे पक्षाला फार टीका सहन करावी लागली. झरदारींवर घोटाळे आणि 10 टक्के कमिशन घेण्याचेही आरोप करण्यात आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button