ताज्या बातम्या

मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणा, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी काय म्हणाले ?


नागपूर : जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा निश्चय आमरण उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

१३ फेब्रुवारीपासून एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर संघटनेने हे आंदोलन सुरू केले असून आज आंदोलनाचा चवथा दिवस होता.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांच्या संबंधाने सरकारकडून ऑक्टोबर २०२३ मध्ये १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, चार महिने होऊनही राज्य शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे संतप्त एसटी कामगार संघटनेने आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे.

या पार्श्वभूमीवर, १३ फेब्रुवारीपासून गणेशपेठमधील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार, विभागीय सचिव प्रशांत बोकडे, पद्माकर चंदनखेडे यांच्या नेतृत्वात प्रवीण पुणेवार, जगदीश पाटमासे, शशिकांत वानखेडे, मीना बोंद्रे, माधुरी वालदे, दिलीप माहुरे, सुनील झोडे, मनोज बघले, प्रदीप पुराम, रफिक दिवाण, योगेश टवले, मंगल चहांदे, प्रवीण अंजनकर, प्रशांत उमरेडकर, मंगेश कुबडे, गजानन दमकोंडवार, नाना आंग्रेकर, प्रमोद वाघमारे, सुनील मेश्राम, जुगेश चौधरी, मनीष बक्सरे, प्रशांत लांजेवार, प्रफुल वाढोनकर, राजेश खांडेकर, सतीश धकाते, राजेश पेंढारी, मो. इलियाज, विनोद धाबर्डे, युवराज बुले, गजबे, पवन नागपुरे, मुकुंद मुळे आदींनी उपोषण सुरू केले आहे.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत शासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना २७ फेब्रुवारीला चर्चेसाठी बोलावले आहे. मात्र, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे उपोषण आंदोलन असेच सुरू राहिल, असे आज संघटनेने सांगितले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button