ताज्या बातम्यादेश-विदेश
पाकिस्तान रेंजर्सकडून सीज फायर कराराचे उल्लंघन, भारतीय सीमेवर गोळीबार
पाकिस्तान रेंजर्सने सीज फायर कराराचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तान जवानांनी आंतरराष्ट्रीय बीएसएफ सीमेवर बुधवारी (दि.14 फेब्रुवारी) अंदाधुंद गोळीबार केला.
पाकिस्तान रेंजरच्या गोळीबाराचा भारतीय बीएसएफ जवानांनी जोरदार प्रतिकार केला. दोन्ही देशांतील जवानांमध्ये झालेल्या हा गोळीबार सुमारे वीस मिनिटं सुरू होता. सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी ही घटना उघडकीस आली, अशी माहिती समोर आली आहे.
या गोळीबारात भारतीय जवान दुखापतग्रस्त अथवा दगावल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये, अशीही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.