कौंटुबिक हिंसा, अनैतिक संबंध, दारू पिणे तसेच नशा करणे आदि कारणामुळेच पति-पत्नी दरम्यान घटस्फोटाचे कारण ठरत असते. मात्र तुम्ही ऐकले आहे का, पतीच्या घाणेरड्या सवयींमुळे एखाद्या महिलेने त्याच्याशी घटस्फोट घेण्याची मागणी केली आहे.
मात्र असा प्रकार समोर आला आहे. तुर्कीमधील एक महिला आपल्या पतीच्या घाणेरड्या स्वभावाला कंटाळली होती. पतीला समजावण्याचा अनेकवेळा प्रयत्न करूनही त्यांनी आपल्या सवयी बदललेल्या नाहीत. यानंतर पतीच्या घाणेरड्या सवयींच्या विरोधात पत्नीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
महिला आपल्या पतीच्या घाणेरड्या सवयीला कंटाळली होती. महिलेचा आरोप आहे की, तिचा पती न ब्रश करतो, तसेच कधी अंघोळही करत नाही. महिलेने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
महिला पतीच्या वाईट सवयींनी त्रस्त झाली होती व तिला पतीपासून विभक्त व्हायचे होते. तुर्की मीडियाने दिलेल्या माहितीनुसार महिलेने दावा केला आहे की, तिचा पती अनेक दिवसांनी अंघोळ करतो. यामुळे त्यांच्या शरीराचा दुर्गंध येत असतो. तो आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच दातांना ब्रश करत असतो.
महिलच्या वकिलांनी न्यायालयात पुरावे सादर केले आहेत. या पुराव्यावरून स्पष्ट होते की, महिलेच्या पतीमध्ये वैयक्तिक स्वच्छता (पर्सनल हायजीन) ची कमी आहे. महिलेची तक्रार ऐकल्यानंतर न्यायालयाने घटस्फोटाला परवानगी दिली आहे.
इतकेच नाही तर न्यायालयाने पतीला आदेश दिला आहे की, त्याने आपल्या अस्वच्छतेने व घाणेरड्या सवयींमुळे पत्नीला दिलेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाईच्या रुपात ५००,००० तुर्की लीरा द्यावेत.