आरोपी भालचंद्र तकीक व विष्णू सोनवणे यांचे विरोधात चेक बुक चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
आरोपी भालचंद्र तकीक व विष्णू सोनवणे यांचे विरोधात चेक बुक चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
फिर्यादी राजेश आतकरे, पोलीस कर्मचारी नेमणूक सहाय्यक व्यवस्थापक पोलीस पेट्रोल पंप बीड यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया चे चेक बुक 2023 चे एप्रिल महिन्यात हरवले बाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती सदरील चेक बुक मधील एका चेकचा आरोपी भालचंद्र तकिक यांनी विष्णू सोनवणे यांच्याशी संगणमत करून पैशाचे लालसेपोटी गैरवापर करून फिर्यादीस एडवोकेट कुक्कडगावकर यांचे मार्फत तीन लाख रुपये मागणी करणारी नोटीस पाठवली त्या वरून आपले चेकबुक आरोपींनी संगणमत करून चोरून नेले बाबत फिर्यादीची खात्री झाली फिर्यादी यांनी माननीय न्यायालयात आरोपी विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीसाहेब बीड यांच्या आदेशाने आरोपी विरोधात पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड येथे फिर्यादी यांचे चेकबुक चोरून नेऊन कट रचून व फसवणूक केल्या प्रकरणी कलम 379, 120, 420, सह 34 भादवी अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 36/2024 गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास बी एन वाघमोडे हे करत आहेत.