ठाकरे गटाला मोठा धक्का! राजन विचारेंच्या घरी आयकर विभागाचा छापा
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी ४ वाजता निकाल जाहीर करतील. अशातच आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा टाकल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार रवींद्र वायकरांनंतर आता खासदार राजन विचारे टार्गेटवर असल्याची त्याचबरोबर तपास संस्थांकडून आज ठाकरे गट निशाण्यावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत
राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. विचारे यांच्याशी संबंधित काही व्यवसायिकांना चौकशीसाठी बोलण्यात आलं आहे, अशी माहिती आहे. काही कार्यालयांवर देखील छापेमारी करण्यात आली असल्याची माहिती आहे.
राजन विचारे सध्या ठाण्यातील हिरानंदानी परिसरात राहतात. ठाण्यातील अन्य एका घरावर देखील धाड टाकण्यात आली आहे. विचारेंच्या जुन्या घरामसोर असलेल्या कार्यलयावर देखील आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच आयकर विभागाकडून कारवाईला सुरूवात झाली आहे.